पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. त्यामुळे परस्पर सहिष्णुता व औदार्यावर ती उभी आहे. या तत्त्वांचा आदर करण्यातूनच संस्कृती संवर्धन शक्य आहे, हा विष्णु प्रभाकरांचा या दोन्ही निबंधातील निष्कर्ष महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, “प्रश्न का एक अर्थ है तलाश। वैज्ञानिक युग में सत्य शाश्वत नहीं होता, सत्य की तलाश शाश्वत होती है। जहाँ तलाश है, वहाँ सिद्धांत है। विधि-विधान सब जड़ हो रहे है, एक दिन नए को पाने के लिए। पाने की इस छटपटाहट में से जो दर्द उपजता है, उसी को सह रहे है हम। दर्द के बिना कुछ मिलता है क्या? यही दर्द इस युग की आशा है। यही एक दिन नए को जन्म देगा और वह नया खण्ड पर नहीं, समग्र पर आधारित होगा।" समग्रतेवरचा विश्वास या लेखनास आशादायी बनवतो.

 या पुस्तकात 'कृष्णकालीन भारत' नावाचा दोन भागातील लेख इतिहास जिज्ञासुसाठी वाचनीय आहे. त्याच्या पहिल्या भागात राष्ट्र व्यवस्था सांगितली आहे, तर दुस-या भागात ‘समाज व्यवस्था'. कृष्ण काळ हा इसवी सन पूर्व १४०० मानण्यात येतो. महाभारतीय सभा पर्व काळ. या काळात राज्यव्यवस्था अस्तित्वात होती. पशुधन हा शेतीचा आधार होता. सिंचनास प्रारंभ झाला होता. गोधनाबरोबर मेषधन प्रधान होते. भूमी विक्री नसायची. परंतु मुद्रा होती. ऋण व्यवस्था प्रचलित होती. ती वस्तुरूप अधिक असे. शिल्प कलेची अवस्था प्राथमिक होती. व्यापार होता. राज्य व संपत्ती सभा समितीद्वारे कार्य चालत असे. राष्ट्र, बहुराष्ट्र कल्पना होत्या. विशेष म्हणजे त्या वेळीही अराजक राष्ट्रे असत. कृष्ण ‘ब्रजपती' म्हणून ओळखला जायचा. प्रश्न सोडवण्याचे साधन म्हणून युद्धाकडे पाहिले जात असे. परंतु संधी, सामोपचारातून मिळालेल्या धनासच सुखाचे निधान मानले जाई. लूट निषेधार्ह होती. देशप्रेम अस्तित्वात होते. आर्य युद्धकला व शस्त्रकलेत पारंगत होते. वाहतुकीसाठी रथ, घोडे, हत्ती वापरले जायचे. युद्धाचे नियम होते. विशेष म्हणजे ते पाळले जायचे. निःशस्त्रावर आक्रमण निषेधार्ह होतं. त्या काळात प्रार्थना प्रथा होती. 'याजुर्वेद' अथवा 'शतपथ ब्राह्मण' मधील खालील प्रार्थना तत्कालीन मनुष्याची मानसिकता व जनजीवन स्पष्ट करते. “हे ब्राह्मण! इस राष्ट्र में ब्रह्मवर्चस्वी (ज्ञानी) ब्राह्मण पैदा हों : शूरवीर, बाण फेंकने में निपुण, निरोग, महारथी, राजन्य (क्षत्रीय), पैदा हों। दधारू गायें, बोझा ढोनेवाले बैल, तेज घोडे, रूपवती युवतियाँ, विजयी रथी, सभाओं में जानेयोग्य जवान (वक्ता), तथा अजमानों के वीर संताने पैदा हो। अब जब हम कामना करें, पानी बरसे। हमारी औषधियाँ फलों से

साहित्य आणि संस्कृती/१७०