पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
घटना, पक्षीय लोकशाही व निवडणूक

 या ग्रंथातील हे प्रकरण तसे पाहिले तर राजकीय व प्रशासकीय. पण सर्व गांधीवादी तत्त्वचिंतक जगातील प्रश्न नैतिकता, शुचिता, आत्मबल, विवेकादी शक्ती व मूल्याने सोडवू पाहतात, तसेच जैनेंद्रांचेही दिसते. त्यांना भारतीय घटना जागतिक घटना तत्त्वांचे सारसंकलन वाटते. त्यात भारतीयतेचा अभाव खटकतो. घटना म्हणजे नियंत्रक व्यवस्था ती जैनेंद्रांना समाज गर्भित असावी वाटते (पृ. २५५). संविधानिक नियमांपेक्षा ते चित्तशुद्धी व विवेक महत्त्वाचा मानतात. सध्याच्या निवडणूक पद्धतीत त्यांना बदल अपेक्षित आहे. वर्तमान निवड पद्धत ही प्रशासनास जबाबदार आहे. ती लोकांना जबाबदार हवी असे जैनेंद्रकुमार सुचवू पाहात आहेत. नीतीबल आणि शक्तीबलात त्यांना संतुलन अपेक्षित आहे. राजकारभार नि राजकारण दोन्हीत त्यांना समाज मूल्य महत्त्वाचे व केंद्रित तत्त्व असावे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण प्रश्न उरतो व्यवहाराचा. बरीच आदर्श मूल्ये असतात चांगली पण त्यांचे व्यावहारिक क्रियान्वयनन कठीण असते खरे! राजकारण मानव कल्याणकेंद्रित हवे हे म्हणणे ठीक. पण रचना काय? याबाबत जैनेंद्र मौन धारण करतात. आश्चर्यकारकरित्या या प्रकरणात जैनेंद्र मार्क्सवादी विचारांची भलामण करतात? नि म्हणतात की, “मैं एक-दलीय कम्युनिस्ट तंत्र का इसलिए प्रशासक हूँ और समर्थक हैं कि राजनीति की स्पर्धा और राजनीति का धन्धा उस कारण समाप्तप्राय हो जाता है।" (पृ.२६१). यात राजकारणातील धंदा बनवणारी स्पर्धा त्यांना उबग आणणारी वाटते इतकेच खरे. (सन १९५0 मध्ये मार्क्सवादी विचार व यशपाल आणि गांधीवादी जैनेंद्र यांच्यात गांधीवाद नि मार्क्सवादावर वाद झडला होता. त्यात जैनेंद्रांनी मार्क्सवादाशी संघर्ष' (Fight) करण्याचा मनोदय व्यक्त केल्याचे आठवते.) (संदर्भ ‘नया साहित्य' - डिसेंबर १९५०) या प्रकरणाच्या उत्तरार्धात जैनेंद्र मार्क्सवादाचा विकल्प गांधीवादास मानतात हे आपणास विसरता येणार नाही. (पृ. २६३). या प्रकरणात जैनेंद्रकुमारांनी लोकशाही, घटना, निवडणूक इत्यादी अनुषंगाने वर्तमान भारतीय राजकीय पर्यावरणात जी अनेकांगी बजबजपुरी दिसते तीबद्दल स्पष्ट शब्दांत जी नाराजी व्यक्त केली आहे त्याकडे आपण सर्वांनी लक्ष पुरवणे सयुक्तिक होईल. त्यांनी म्हटले आहे की, “प्रजातंत्र यदि शिथिलाचार, भोगाचार, धनाचार और भ्रष्टाचार और समाज की तलहटी में अनाचार, कुत्सित और बीभत्स दुःखदैन्य के दृश्यों का ही नाम हो, तो मैं उसका समर्थन नहीं कर सकेंगा।" (पृ. २६२), 'हमारे दल और नेता

साहित्य आणि संस्कृती/१५६