पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्ञानाचा कोरा वापर झाला की अशी शोकांतिका ठरलेली. 'ज्ञान व्यथा से नाता तोड लेता है कि सूखा काठ (वाळलेले लाकूड) हो जाता है।" (पृ. १७८)

‘अर्थ’ आणि ‘मूल्य' संघर्ष

 अर्थ-क्षेत्र में मूल्यों का संकट' शीर्षकातूनच जैनेंद्र अपेक्षित विचार वाचकांपर्यंत पोहोचवतात. त्यांची या पुस्तकातील सर्व उपशीर्षके अशी लक्षवेधी व विचारप्रवण आहेत. युरोपातील अर्थव्यवस्था कशी पाशवी आहे, ते जैनेंद्रांनी स्पष्ट केले आहे. अर्थसंपन्न देश आयात-निर्यातीचे संतुलन ठेवत नसल्याने श्रीमंत देश अधिक श्रीमंत होत राहतात. त्यावर उपाय सुचवताना जैनेंद्रांनी म्हटले आहे की, “हर देश के लिए निर्यात को आयात से बढाये रखना जरुरी है, अन्यथा विकास नहीं माना जायेगा।' (पृ. १८५) जैनेंद्र तसे मॅट्रिक झालेले पण सर्व क्षेत्रातील त्यांची भाष्य करण्याची गती बघितली की लक्षात येते खरे शिक्षण अनुभवजन्य असते. माणसाचे उपजत शहापणच त्याला जीवनात घडवत असते. शिक्षण एक औपचारिक, व्यवहारी समाज मान्यता असते. मद, मोह, धर्म, नैतिकता सायांचा प्रभाव देशाच्या अर्थ व्यवस्थेवर होत असतो. युरोपात द्वेष आणि द्रोह व्यवहाराने मूल्य बनलीत याबद्दलचा विषाद जैनेंद्रांना लपवता आलेला नाही. पैसा हे प्रेमाचे साधन होय, मूल्य हे मुद्रेत नसून श्रमात आहेत. पण वस्तुस्थिती अशी झाली की, “आज खेत में यदि नाज (अनाज) पैदा होता है, तो खेतीहर (शेतकरी) के पासही खाने के लिए वह जुट नहीं पता। अर्थात वस्तू मुद्रा के जोर से सिंची हुई वहाँ पहुँच जाती है, जहाँ श्रम नहीं, सिक्के की शक्ति है। शेतक-याच्या शोकांतिकेचं इतकी मार्मिक चिकित्सा, टिप्पणी रिझर्व बँकेचे गव्हर्नर ही करू शकणार नाही. ही असते जैनेंद्रातील चिंतक शक्ती व सामर्थ्य साधना! अर्थाच्या, धनसंपत्तीच्या परमार्थीकरणाचा एक विचार जैनेंद्रांनी ‘समय और हम' मध्ये मांडला आहे. त्यानुसार “उस परमार्थीकरण के हिसाब या आरंभ यह होगा कि मनुष्य की प्राथमिक भोग-शरण -पोषाख की आवश्यकताएँ बाजार-निर्भर नहीं होगी। वे बेच-खरीद के सिद्धांत से स्वतंत्र होगी। वह प्राथमिक आपसीपन, अर्थात् ग्राम-श्रम, में से अनायास (आपोआप) पूरी होगी। अर्थात भूखा रखने न रखने, कामिंदा (श्रमिक) रखने न रखने की शक्ति आदमी से कहीं भी दूर न रहेगी, वह हर एक के पास आ जायेगी। फिर इस मूल इकाई, अर्थात सृजनशील मानव की उदारता से जीवन साधन उन लोगों के पास भी पहुँचेगे, जो शारीरिक दृष्टि से किंचित असमर्थ है।" (पृ. १९६).

साहित्य आणि संस्कृती/१५१