पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या निबंधातून आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांनी भारतीय संस्कृतीच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचा परिचय करून देत माणूस घडणीचे जे सूत्र विशद केले आहे, ते त्यांच्या भारतीय प्राचीन परंपरेच्या अभ्यास व चिंतनाचा परिपाक म्हणून पाहावा लागेल. आजही सारे जग इतक्या भौतिक संपन्नतेनंतर अशांत, अस्वस्थ का, याचा आपण शोध घेऊ लागतो, तेव्हा लक्षात येते की भौतिकाचा सारा संबंध बाह्य व्यवहाराशी असतो. माणसाचा खरा विकास म्हणजे सभ्यतेचा अंगीकार आणि त्यातून स्वतःचा शोध होय. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म देवत्वाची चर्चा करत असले, तरी ती सारी प्रतीके होत. मूळ लक्ष्य सदाचार, सद्व्यवहार, मानवता, समता हेच त्या संस्कृतीचे मूळ संचित होय. मधल्या काळात भारतीय संस्कृतीत निर्माण वर्णाश्रम, कर्मकांड हे काही मूळ नव्हे. कालौघात झालेले ते बदल होत. त्यांच्या परिष्काराचा विवेक व वैराग्य व्यवहार म्हणजे माणसाचं सुसंस्कृत आचरण हे सूत्रबद्ध सांगणारा हा निबंध आचार्यांच्या साहित्यिक शब्द सामथ्र्याचा दृष्टान्त तसाच विचार वैभवाची साक्ष!


संस्कृतींचा संगम


 ‘कल्पलता' निबंध संग्रहातील ‘संस्कृतियों का संगम' निबंधातून आचार्य द्विवेदींनी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी विविधतेचे जे सौंदर्य भरलेले आहे, त्याच्या रहस्याचा उलगडा केला आहे. आचार्यांचा इतिहासाचा व्यासंग यातून सिद्ध होतो. भारताचा मध्य व दक्षिण भाग (म्हणजे मध्य प्रदेशासह दक्षिण भारत) हा सर्वाधिक प्राचीन भूभाग. तो नंतर तयार झाला. त्यामुळे भारतातील पहिली वस्ती (संस्कृती) आपणास विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आढळते. हा भूप्रदेश पूर्वी ऑस्ट्रेलिया, निकोबार, मलाक्का यांना जोडलेला होता. यातून आचार्यांनी केलेला भारताचा भौगोलिक अभ्यासही स्पष्ट होतो. इथे पूर्वी मुंडा आणि कोल जातीच्या माणसांची वस्ती होती. या संस्कृतीतील वृक्ष, कृषी अवजारे यांची नावे आपणास आर्य भाषांमध्ये आढळतात. भारतीय संस्कृतीत लिंग पूजेची परंपरा (शिवलिंग, लज्जागौरी इ.) या प्रारंभिक संस्कृतीतून आर्य संस्कृतीत आल्या. भारतीय संस्कृती स्थलांतरणास सुरुवात झाली ती अगस्त्य ऋषींच्या विंध्यपार पर्यटनाने. भारतीय संस्कृतीचा क्रमागत अभ्यास करायचा तर आपणास एकूणच मानवी संस्कृती विकासाचा म्हणजे अश्मयुग, लोह युग, ताम्रयुग इ. चा अभ्यास

साहित्य आणि संस्कृती/१०८