पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पेचातून मुक्त करण्यासाठी एक निराळीच युक्ती योजिली.
 आत्मनस्तु कामाय ! पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा केवळ स्वार्थी आहे. 'न वा अरे जायायाः कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती।' 'पत्नीसाठी पत्नी प्रिय नसून स्वतःसाठी ती प्रिय असते' हेच प्राकृत अर्थाने कसे खरे आहे, पुरुषाचे ते एक खेळणे कसे आहे, घरकुलात मांडलेली ती बाहुली आहे, असे पुरुषाला कसे वाटते हे सर्व नोराची मैत्रीण लिंडा हिने योजलेल्या युक्तीतून जो प्रसंग उद्भवला त्यामुळे अगदी स्पष्ट झाले. इब्सेनचे नाट्य रचनेचे पराकाष्ठेचे कौशल्य या ठिकाणी प्रगट झाले आहे.
 पूर्ववयात लिंडाचे क्रॉगस्टॅडवर प्रेम होते. त्याचा विवाहही ठरला होता. पण आई व दोन भाऊ यांचा भार तिच्यावर होता. म्हणून क्रॉगस्टॅडला नकार देऊन तिने एका श्रीमंत माणसाशी लग्न केले, पुढे तो गृहस्थही वारला. पण त्या अवधीत लिंडाची आई गेली होती आणि भावांनाही नोकऱ्या लागल्या होत्या. तेव्हा ते गाव सोडून ती परत आली होती आणि नोकरीच्या शोधात होती. आणि आता तिला नोकरी मिळणार होती ती क्रॉगस्टँडची नोकरी गेल्यामुळे ! म्हणजे पुन्हा दुसऱ्याने नियतीने लिंडाला क्रॉस्ट्रॅडच्या घातास प्रवृत्त केले होते. पण लिंडाने आता निराळा विचार केला, क्रॉगस्टॅडकडे ती गेली व आपण लग्न करून संसार मांडू असे बोलणे तिने केले. तोही एकाकी जीवनाला कंटाळा होता. म्हणून त्याला ते मानवले आणि या नव्या नात्याच्या आधारे हेल्मरला पाठविलेले पत्र त्याने परत घ्यावे, असे त्याला विनविण्यास ती त्याच्याकडे गेली. पण तो गावाला गेला होता. त्यामुळे पत्र परत घेणे नमले नाही.
 टोरवॉल्ड हेल्मर याच्या हाती ते पत्र पडताच तो आगदी पिसाट होऊन गेला. आणि नोराला वाटेल ते बोलू लागला. "मला ही शंका येतच होती. तुझ्या वडिलांचीच तू मुलगी. धर्म, नीती त्यांना काही माहीतच नव्हते. तशीच तू झालीस यात नवल कसले ? माझ्या सर्व कीर्तीला तू काळीमा लावलास. हे सर्व माझ्यासाठी केलेस म्हणतेस. पण असल्या सबबी मला सांगू नकोस. एक शब्द बोलू नकोस. लोक काय म्हणतील ? माझ्याच सांगण्यावरून तू खोटी सही केलीस, आणि आता मी नामानिराळा होत आहे. असेच ते म्हणणार. माझे सर्व भवितव्य तू काळे केलेस. मी तुझ्यावर परकाष्ठेचे प्रेम केले. पण तू त्याची अशी फेड केलीस. पण आता हे निस्तरले पाहिजे. सर्व मिटविले पाहिजे. बाहेरच्या जगाला यातले काही कळता कामा नये. मी तुला येथे राहू देईन. पण मुलांशी तुझा संबंध येता कामा नये. त्यांचे संगोपन करण्याची तुझी लायकी नाही."
 भ्रम निरास टोरबॉल्डचे हे बोलणे ऐकत असताना नोराच्या मनात फार मोठे परिवर्तन घडत होते. आतापर्यंत ती खरोखरच एक बाहुली होती. आता ती एक प्रौढ स्त्री होऊ लागली. या प्रकरणाला प्रारंभ झाला तेव्हाच या परिवर्तनाला

७८
साहित्यातील जीवनभाष्य