पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





४ स्त्री जी व न भा ष्य



 माझी साळुंकी आपली नोकरी जाणार हे कळताच क्रॉगस्टॅड चिडून गेला. नोराला त्याने कर्ज दिले होते. त्यामुळेच टोरवॉल्डचे प्राण वाचले होते. आणि तो टोरवाल्डच आता त्याला काढून टाकणार होता. तेव्हा या बाबतीत नोराला भेटावे, असे त्याने ठरविले. पण तो साधा वशिला लावण्यासाठी आला नव्हता. नोराचा कर्ज फेडीचा कारभार अगदी गुप्तपणे चालला होता. त्यातले एक अक्षर जरी टोरबॉल्ड हेल्मर याला कळले असते तरी त्याने अनर्थ केला असता. स्त्रीच्या बाबतीत त्याचे विचार अगदी कर्मठ सनातन होते. आपल्या नकळत आपल्या बायकोने कर्ज काढले होते, आणि पुढे ते फेडण्यासाठी आपल्या नकळत कष्टाची कामे केली होती, ती लपविण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारे खोटेनाटे सांगितले होते. हे सर्व त्याला कळले असते तर त्याने नोराला हाकलूनच दिले असते. एकदा कॉगस्टॅड त्याच्या. घरातून बाहेर पडताना त्याला दिसला. त्याने नोराला विचारले. तिने आपल्याला माहीत नाही, असे सांगितले, पण तिच्याकडेच तो आला होता. ते उघडकीस येतांच टोरवॉल्डने सौम्यपणे, पण मोठ्या गंभीरपणे, नोराला नीती अनीतीचे पाठ दिले होते. तो तिला माझी कोकिळा, माझी साळुंकी, माझी मंजुळा अशा लाडक्या नावाने हाका मारीत असे. त्याचे तिच्यावर प्रेमही होते; पण त्याला मर्यादा होत्या. कर्जासारखा पुरुषी व्यवहार नोराने केला आणि त्यासाठी आपल्याशी ती खोटे बोलली, हे त्याला सहन झाले नसते. म्हणून त्याला एक अक्षरही कळू न देण्याची खबरदारी नोराने घेतली होती. क्रॉगस्टॅडला नोराचे हे मर्म माहीत होते. त्याचा फायदा तो घेणार होता. आपली नोकरी गेली. तर टोरवाल्डला आपण तो सर्व व्यवहार सांगू, अशी धमकी तो देत होता.
 एवढाही हक्क नाही ? पण एवढ्याने भागत नव्हते. तो व्यवहार उघडकीस - येण्याने दुसरा एक अनर्थ ओढवणार होता. कर्जखतावर वडिलांची सही करताना

७६
साहित्यातील जीवनभाष्य