पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे असे त्याला वाटू लागले. आणि तो अस्वस्थ झाला. अंधार पडल्यावर थकून जाऊन एका दगडावर तो स्वस्थ वसला. त्याचे मन मात्र भ्रमत होते. एवढ्यात जर्हिस नावाचा दहा एक वर्षाचा मुलगा खेळत खेळत तेथे आला. एक रूपया वर उडवून तो झेलण्याचा खेळ तो खेळत होता. पण एकदां तो रूपया खाली पडला व घरंगळीत व्हॅलीनच्या पायाखाली गेला. त्याला त्याची दादही नव्हती तो भ्रांतीतच होता. जर्हिसने त्याला खूप विनविले, पण व्हॅलेनिनला त्याचे भान झाले नाही. नसती कटकट आहे, असे वाटून तो मुलाच्या अंगावर खेकसला. तो बिचारा घाबरून पळून गेला. थोड्या वेळाने व्हॅलजिन उठला. तेव्हा तो रुपया दिसला आणि सर्व प्रकार त्याच्या ध्यानात आला. यापूर्वी त्याला त्याचे काहीच वाटले नसते. त्या मुलाची मान मुरगळून सुद्धा त्याने त्याचे पैसे काढून घेतले असते. आदल्याच रात्री भांडी चोरताना बिशपांना ठार करण्याचा त्याचा विचार होताच. पण आता त्याच्या मनात जमीन अस्मान परिवर्तन झाले होते. बिशपांच्या प्रेमामुळे, त्यांच्या औदार्यामुळे त्यांच्या निरपेक्ष दयेमुळे, त्याच्या मनातील आसुरी संपत्ती धुवून गेली होती व देवी संपत्तीचा तेथे उद्भव झाला होता. आपण हे एक भयानक दुष्ट कृत्य केले, असे त्याला वाटू लागले. जर्हिसची बालमूर्ती त्याच्या डोळ्यापुढे उभी राहिली. माणि त्याच्या जीवनाचा कंदच हालून गेला. 'बाळ जर्हिस, येरे, कुठे असशील तिथून ये तुझा रुपाया घेऊन जा. अरे मी किती नीच आहे ! बदमाष आहे ! एका लहानग्याचा. रुपया मी हिरावून घेतला. धिक्कार असो मला !' असे म्हणून व्हॅलजीन ढसढसा रंडू लागला. एकोणीस वर्षांत त्याच्या डोळ्याला कधी टिपूस आले नव्हते. त्याने कधी कोणासाठी अश्रू ढाळलेच नव्हते. ज्याच्यासाठी अश्रू ढाळाने असे कोणी त्याला भेटलेच नव्हते. आज मात्र बाळ जर्हिस आणि बिशप मीरियल यांच्या मूर्ती त्याच्या डोळ्यांपुढून हलेनात आणि त्याचे अश्रूही थांबेनात. बिशपांच्या घराच्या दिशेला वळून त्याने गुडघे टेकले व तो प्रार्थना करू लागला. त्यांचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. 'तुझे पूर्वायुष्य संपले. सन्मार्गाने जाण्याचे तू मला अभिवचन दिले आहेस.' वास्तविक त्याने तसे वचन केव्हाच दिले नव्हते. पण आता मात्र त्याच्या अंतरात्म्याने ते दिले.
 नेटलचा उपयोग तशाच स्थितीत प्रवास करीत व्हॅलजीन एम्. या गावी येऊन पोचला. त्याच वेळी तेथे एका घराला आग लागली होती. मोठ्या धाडसाने तीत उडी टाकून त्याने दोन मुलाना वाचविले यामुळे त्या गावात त्याचे स्वागत झाले च तेथे राहू लागला. एम्. गावी कृत्रिम मणी तयार करण्याचा धंदा चाले. व्हॅलजिन त्यात शिरला आणि त्या मण्यासाठी एक निराळे द्रव्य तो वापरून पाहू लागला. त्यामुळे मणी जास्त सुंदर व फार स्वस्त पडू लागले व धंद्याला एकदम बरकत आली. व थोड्याच दिवसात व्हॅलजीनला विपुल पैसा मिळाला. एम्. गावी राहू लागल्यापासून त्याने फादर मडलीन हे नाव धारण केले होतें आणि पैसा मिळू लागताच रंजले

दलित जीवन
६३