पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'बरोबर आहे' दुसऱ्याने त्यांना साथ दिली. 'देवाने त्याच जन्माला त्यांना घातले आहे. तेव्हा आपण त्याच्या इच्छेविरुद्ध बोलणे हे पाप होय.'
 सत्य व कल्पित अशा तऱ्हेच्या तत्वज्ञानावाचून, या श्रद्धेवाचून माणूस दीर्घकाळ पर्यंत कोणचीही रुढी, कोणताही आचार, कोणतीही समाजव्यवस्था दीर्घकाळ टिकवून धरू शकणार नाही. सौ. स्टोव्हे यांनी मानवी जीवनाचे हे मर्म जाणले होते. हे अंकल टॉमच्या या कथेत ठायी ठायी दिसून येते आणि यासाठीच अमेरिकनांनी निग्रो विषयी बनविलेले तत्वज्ञान ढासळून टाकण्याचा त्यांनी पानोपानी प्रयत्न केला आहे. निग्रोंच्याही अंगी देवी संपदा असू शकते ही स्टोव्हे यांची श्रद्धा पुढील इतिहासाने खरी असल्याचे दाखविले आहे. निग्रोसाठी इस्केजी विद्यापीठाची स्थापना करणारे बुकर टी वॉशिंग्टन प्रसिद्धच आहेत. त्याच संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून अध्यापन करणारे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे जगविख्यात शास्त्रज्ञ होते. अमेरिकेच्या आजच्या शास्त्रीय शेतीचा पाया त्यांनीच घातला आहे. एम्. ए. झाल्यावर आयोवा विद्यापीठात त्यांना प्राध्यापकाची जागा मिळाली होती. तेथे त्यांना पैसा, प्रतिष्ठा, कीर्ती सर्व अमाप प्रमाणांत मिळाले असते. पण बुकर टी वॉशिंग्टन यांचे निमंत्रण येताच हे सर्व सोडून ते तिकडे गेले व जन्मभर तेथेच राहिले. १८६२ साली गुडांनी त्यांच्या आईला पळवून नेऊन विकले होते. तेव्हा ते सहा महिन्याचे होते. तरी त्यांनी गोऱ्या अमेरिकनाविषयी द्वेष बुद्धी बाळगली नाही. कारण मोझेस कार्व्हर यांच्या पत्नी सौ. कार्व्हर या गोऱ्या स्त्रीनेच त्यांचा तेव्हापासून प्रतिपाल केला होता. आपल्या शास्त्रीय शोधाच्या सनदा (पेटंटस्) त्यांनी घेतल्या असल्या तरी कोट्यवधी डॉलर्स त्यांना मिळाले असते. पण एकही सनद त्यांनी घेतली नाही. आपली प्रतिभा त्यांनी मानवसेवेला अर्पण केली होती. दैवी संपदा याहून निराळी असते काय? मार्टिन लूथर किंग हे महात्माजींचे शिष्य म्हणून प्रसिद्ध होते. अन्यायाच्या प्रतिकाराचा लढा शांतता, अहिंसा या तत्वांवरच ते करीत निम्रो उपेक्षितांचे हे अंतरंग जगाच्या निदर्शनास आणून देणारी लेखिका ही फार श्रेष्ठ जीवनभाष्यकार होय यात शंका नाही.
 संभाव्य संपदेचा नाश विख्यात फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगो याने आपल्याला .'मिझरेबल्स' या कादंबरीत दलितांविषयी हेच तत्त्वविचार मांडले आहेत. परिस्थितीमुळे काही लोक गुन्हा करतात, भ्रष्ट होतात, पतित होतात. त्यांची मूळ प्रवृत्ती तशी नसते. त्यांच्या अंतरात सत्प्रवृत्तीच असते, पण परिस्थितीपुढे ते असहाय होतात. अशा वेळी समाजाने क्षमाशीलवृत्तीने त्यांच्याकड़े पाहून त्यांना सावरून घेतले, पुन्हा ते पापप्रवृत्त होणार नाहीत अशी काळजी वाहिली, तर ते लोक सन्मार्गाला निश्चित लागतील. इतकेच नव्हे तर थोर संतसाधूंच्या, महात्म्यांच्या पंक्तीला जाऊन बसण्या इतकी दैवी संपदाही त्यांच्या ठायी जोपासली जाईल. पण समाज असे करीत नाही. माणूस च्युत झाला की, समाज त्याला कायमचा बहिष्कृत करतो. त्याने गुन्ह्याची शिक्षा भोगल्यानंतरही त्याला जवळ करीत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा गुन्हे

दलित जीवन
५९