पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १ निग्रो गुलाम वात्सल्य, अपत्य प्रेम हा मातेचा अमोल गुण. आपल्या बाळासाठी सर्वस्वाचा त्याग करणे हे त्यांचे प्रधान लक्षण. 'अंकल टॉमस् केबिन' या कादंबरीत स्टोव्हे यांनी निग्रो स्त्रीच्या ठायीसुद्धा या गुणाचा परम उत्कर्ष असू शकतो हे आपल्याला दाखविले आहे. एलिझा ही निग्रो तरुण स्त्रीच्या, जॉर्ज या एका गुलामाची बायको. श्री. शेल्बी यांच्याकडे ती गुलाम म्हणून कामाला होती. हे शेल्बी मोठे कनवाळू गृहस्थ होते. ते गुलामांना मायेने वागवीत असत. पण दैववशात ते कर्जबाजारी झाले व कर्जाच्या फेडीत गुलामांना विकण्याचा त्यांच्यावर प्रसंग आला. अंकल टॉम हा त्यांचाच गुलाम. सावकार हॅले याला त्याला विकण्याचे त्यांनी ठरविले. पण हॅले तेवढ्यावर कबूल होईना एलिझाचा मुलगा भरीला द्या, अशी मागणी त्याने केली. शेल्बीना नाइलाजाने ती कबूल करावी लागली. एलिझाला ते कळले मात्र. रात्र पडताच मुलाला घेऊन ती पळाली. अमेरिकेत त्यावेळी या गुन्ह्याला मृत्यूचीच शिक्षा होती. पण तरी एलिझाने ते साहस केले. वाघासारखे शिकारी कुत्रे घेऊन हॅले तिचा पाठलाग करीत होता. समोर नदीला तुफान आले होते. पण बाळाला हृदयाशी धरून त्या मातेने त्या अस्मान लाटांत उडी फेकली. आणि ती सुखरुप परतीराला पोचली. तिला हे बळ कोठून आले ? जगातल्या सर्व मातांना येते तेथूनच ! स्टोव्हे म्हणतात, 'हृदयाशी बिलगलेल्या त्या बालकाच्या स्पर्शाने, त्याच्या निरागस मुद्रेने तिच्या अंगात विजेचा संचार झाला. मनाची या जड शरीरावर चालणारी शक्ती मोठी अद्भूत आहे. ती काही क्षणी त्याला पोलादी बळ देते आणि मग दीनदुबळे हे समर्थ होतात.'
 सीनेटर बर्ड नदी ओलांडून एलिझा पलीकडल्या ओहिओ स्टेटे मध्ये शिरली आणि तेथले सीनेटर बर्ड यांच्या घरी आश्रयाला गेली. या सीनेटर बर्डनी त्याच दिवशी सीनेटमध्ये स्वतः ठराव मांडून एक कायदा पास करुन घेतला होता. मालका पासून पळून गेलेल्या निग्रो गुलामांना जो आश्रय देईल, मदत करील त्याला या कायद्याने मोठी शिक्षा ठेवली होती. सौ. बर्ड या फार मायाळू होत्या. असला कायद केल्याबद्दल त्या पतीवर फार रागावल्या होत्या. हे ख्रिश्चन धर्माविरुद्ध आहे, माणुसकी विरुद्ध आहे, असे त्या सांगत होत्या. सीनेटर बर्ड त्यांना युक्तिवाद सांगत होते. पण त्या म्हणाल्या काही सांगू नका, मी फक्त बायबल जाणते. भुकेल्यांना अन्न द्यावे, उघड्याना वस्त्र द्यावे, अनाथाला आश्रय द्यावा एवढेच मला माहीत आहे. तुमचा कायदा मूर्तिमंत पाप आहे' सीनेटर बर्ड जरा त्रासूनच गेले होते. इतक्यात एलिझा मुलाला घेऊन त्यांच्या घरी आश्रयाला आली. अर्थात सौ. बर्ड यांनी तिला आश्रय दिला, तिची सेवा शुश्रूषा मुलीप्रमाणे केली, तिला जेवू घातले आणि तू येथे निश्चिंत रहा, असे आश्वासन दिले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की सीनेटर बर्ड यानीही तेच केले. एलिझाला पाहून त्यांचे त्यांचे मन इतके विरघळले की, स्वतः त्याच दिवशी केलेला कायदा त्यांनी मना आड केला. आणि बायको पेक्षाही तिची जास्त काळजी

दलित जीवन
५५