पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रकाशकाचे दोन शब्द


 

महाराष्ट्राचे एक थोर विचारवंत प्राध्यापक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी सन १९६५ साली मुं. म. ग्रंथ संग्रहालयाच्या गजेंद्रगडकर व्याख्यानमालेत "साहित्यातील जीवनभाष्य" या विषयावर तीन व्याख्याने दिली.
 श्रीगजेंद्रगडकर व्याख्यान मालेत होणारी व्याख्याने पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याची संस्थेची प्रथा आहे. या प्रथेनुसार या विषयावर स्वतंत्र पुस्तक लिहून देण्याची विनंती आम्ही डॉ. सहस्रबुद्धे यांना केली व ती त्यांनी तत्परतेने मान्य केली. आपले विविध व्याप व प्रकृति अस्वास्थ्य यांना तोंड देत देत डॉ. सहस्रबुद्धे यांनी हे अभिवचन पुरे केले, त्याबद्दल संग्रहालय डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे ऋणी आहे.

-प्रकाशक