पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खटका उडाल्याचे त्याला कळले. न्या. ग्रॅगान यांनी खाजगीरीत्या ज्यूरीला सायमनचे पत्र दाखविले होते. न्यायालयात ते पुढे आणले नव्हते. हे बेकायदेशीर आहे, हे जॅकिनला त्यावेळी माहीत नव्हते. पुढे ते कळल्यावर तो संतापला व त्या जेसुइटांवर उखडला. त्यांनी त्याला परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. चर्चसाठी कोणतीही काळी कृत्ये करण्यास हरकत नाही, त्यांनी देव रागवत तर नाहीच उलट त्या धर्मकृत्यामुळे प्रसन्न होतो. असा उपदेश त्यांनी केला. पण जॉकन म्हणाला, 'देव असा असणे अशक्य आहे. देव दीनांचा वाली असतो. तो असत्य, अन्याय, गुन्हेगारी कधीच सहन करणार नाही.' स्वतःचा प्रमाद असा ध्यानी आल्यामुळे जॅकिन हा न्या. ग्रॅगान यांनी बेकायदा खाजगीरीत्या पत्र दाखविले असा लेखी जबाब देण्यास सिद्ध झाला. या सर्व पुराव्याच्या आधारे डेल्बॉस यांनी फेरतपासणीचा अर्ज करून पॅरिसला जाऊन फिलिबिनच्या घराची झडती घेण्याचा हुकूम मिळविला. त्याचा अदमास खरा ठरला. फादर फिलिविनच्या घरी खोल दडविलेला तो कित्याच्या कागदाचा कोपरा सापडला. सायमनला परत आणण्यात आले. खटला पुन्हा चालविण्याचे फर्मान निघाले.
 असत्याची कैफियत कॅथॉलिक धगुर्मरूचा गुन्हा आता उघडकीस आला होता. पण त्यांचे औद्धत्य असे की, आम्ही हे धर्मरक्षणासाठी केले. तेच करणे. बरोबर आहे असे ते सांगू लागले. फादर फिलिबिन म्हणाला, मी कित्याचा तुकडा काढून लपवला हे खरे पण ज्यूंनी फ्रान्सचा नाश करण्याचा घाट घातला होता. त्यांना शिक्षा करण्यासाठी मी हे केले. फ्रान्सच्या रक्षणासाठी मी हे केले. मला ते भूषणास्पदच वाटते. न्या. ग्रॅगान यांनी ज्यूरीला बेकायदारीतीने पत्र दाखविले हे मान्य केले. पण त्यांनीही असेच समर्थन केले. ला पेटिट बोमंटाइस हे पत्रही त्याच सुरात लिहू लागले. आणि आश्चर्य असे की लोकांनाही ते पटू लागले. त्यांचा ज्यूविरुद्धचा संताप गेल्या दहा वर्षात जरा ओसरला होता. पण पुन्हा त्याला कढ येऊ लागले. त्यात खटला चालू असताना कॅथॉलिकांनी पुन्हा पूर्वीचीच युक्ती केली. काही बनावट पत्रे खाजगीरीतीने ज्यूरीला दाखविण्याची व्यवस्था केली. आणि या सर्वांचा परिणाम होऊन ज्यूरीने पुन्हा सायमनला दोषी ठरविले. न्या. गायबरो यांनी दहा वर्षे एकलकोंडीची त्याला शिक्षा दिली. पण यावेळी ज्यूरीने क्षमेची शिफारस केली होती. तिचा फायदा घेऊन सायमनपक्षाने अर्ज केला आणि तो मंजूर होऊन सायमनला माफी मिळून त्याची सुटका झाली. पण यामुळे आपणच सत्य ठरतो अशा आविर्भावाने कॅथॉलिकपक्ष जास्तच चेकाळून गेला.
 अंतिम विजय पण कॅथॉलिकांची गुन्हेगारी जाहीर झाल्यामुळे मार्कच्या खाजगी जीवनात एक सुखाचा क्षण आला. जिनिव्हीला सायमन निर्दोषी आहे हे पटले. तिच्या आजीचा हेकट दुराग्रह तसाच कायम होता. पण तिची आई मॅडम बर्थेस ही आता आसन्नमरण झाली होती. आज अनेक वर्षे ती आपल्या आईच्या

भिन्न वर्गांचे जीवन
४१