पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्य आहे, असे त्याला वाटू लागले. एक दिवस सत्याची महती इतक्या परिणामकारक रीतीने त्याने वर्गात सांगितली की, ज्याने कित्याच्या कागदाविषयी खोटे सांगितले होते तो मुलगा सेवास्टियन वर्गात रडू लागला. व तास संपल्यानंतर त्याने आपला अपराध कबूल केला. आणि घरी जाऊन आईला तसे सांगितले. ती पुन्हा घाबरली. व लगेच मार्ककडे येऊन तिने सांगितले की, तो कागद माझ्याकडे होता, पण मी तो फाडून टाकला. मार्कची अत्यंत निराशा झाली. या तुमच्या कृत्यांमुळे एक निरपराधी मनुष्य नरकयातनात पिचत पडला आहे, त्याची बायकामुले तडफडत आहेत असे तो तिला म्हणाला. पुढे काही दिवसांनी तिचा सुलगा सेबास्टियन आजारी पडला व लवकर बरा होईना. तेव्हा तिच्या मनात डांचू लागले. त्या आपल्या पापामुळे सेवास्टियन बरा होत नाही, देवाने आपल्याला ही शिक्षा दिली आहे, असे तिच्या मनाने घेतले व मार्कला घरी बोलावून प्रांजळपणे आपण खोटे बोलल्याचे त्याला सांगून तिने कपाटात लपवून ठेवलेला कागद याच्या स्वाधीन केला. झेफेरिनच्या तोंडात सापडला तसाच तो कागद होता. त्यावर कॅथॉलिक शाळेचा शिक्का होता व ब्रदर गर्जियास याची स्वाक्षरी होती. असले कित्ते आमच्या शाळेत नसतातच असे धर्मगुरूंनी सांगितले होते. धर्मरक्षणासाठी त्यांनी हे केले होते. आता धर्म त्यांच्यावर उलटला होता. कागद लपविणे हा अधर्म आचरला म्हणूनच मुलगा आजारी पडला, असे ॲलेकझेंद्राबाईला वाटले आणि त्यामुळेच तिने अपराध कबूल करून तो मार्कला दिला. आणि खरोखरीच दुसऱ्या दिवसापासून मुलाला आराम पडला. माणसांचे मतपरिवर्तन असेच होत असते. विवेक, बुद्धिवाद, जनहित, धर्मतत्त्वे यांनी ते होत नाही. स्वतःचे सुखदुःख, हिताहित, प्रियजनांची माया, वात्सल्य, प्रेम हीच कारणे बहुधा सर्वत्र प्रभावी असतात. हे मूर्त करून दाखविणे याचेच नाव साहित्यातील जीवनभाष्य.
 धर्मासाठी काळी कृत्ये कित्त्याचा कागद मार्कला सापडला आहे, तो कॅथॉलिक शाळेतलाच आहे, झेफेरिनच्या तोंडात सापडलेल्या किल्यासारखाच तो आहे, त्यावर ब्रदर गॉर्जियासची सही आहे, शाळेचा शिक्काही उजव्या कोपऱ्यात आहे, हे जाहीर होताच धर्मगुरु पक्ष घाबरला. ब्रदर गॉर्जियास तर फरारीच झाला. व फादर फिलिबिन, ब्रदर फुलजन्स यांवर वाटेल ते आरोप करू लागला. तेही आता खाजगीत त्याच्या विरुद्ध बोलू लागल्याचे सायमनचा वकील डेल्वास याच्या कानी आले. तेव्हा त्याला एक आशा वाटली. सत्य प्रगट झाल्यावर, न जाणो, आपले कॅथॉलिक भाई आपल्या विरुद्ध उलटतील ही त्या सर्वांना भीति वाटत होती, हे त्याच्या ध्यानी आले. त्यामुळे पुढे मागे गॉर्जियास फारच उलटला तर त्याच्याविरुद्ध पुरावा असावा म्हणून कदाचित फादर फिलिविन याने तो चलाखीने कापून घेतलेला कित्त्याचा तुकडा जपून ठेवला असेल असे त्याला वाटले. याच सुमारास सायमनवरील खटल्याच्या वेळचे सरपंच जॅकिन यांचा फादर क्रॅबट व फादर फिलिविन यांच्याशी

४०
साहित्यातील जीवनभाष्य