पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेऊन निधर्मी, इहवादी संस्थांच्या हाती द्यावयाचे, असे सरकारने ठरविले होते. तसा कायदाही झाला होता. पण त्याची बजावणी कसोशीने झाली नव्हती. या ढिलाईचा फायदा घेऊन रोमन कॅथॉलिक धर्मरूंनी विशेषतः जेसुइट पंथीयांनी सर्व शिक्षण क्षेत्र व्यापले. अंधश्रद्धा शब्दप्रामाण्य, कर्मकांड, व्रतवैकल्ये हेच जेसुइटांच्या धर्माचे स्वरूप होते. आणि विज्ञानयुगात हे सर्व टिकवून धरण्यासाठी असत्य, अन्याय, अनीती यांचा आश्रय करण्यास ते कचरत नसत. (परक्या मिशनऱ्यांनी भारतात चालविलेली कारस्थाने डोळयांपुढे आणावी म्हणजे कॅथॉलिक धर्माचे स्वरूप नीट आकळेल.) एवढेच नव्हे तर धर्मरक्षणासाठी ते करणे अवश्य आहे असे त्यांचे मत होते.
 जेसुइटांचा धर्म रोमन कॅथॉलिक पंथ ही अत्यंत संघटित, समर्थ व बलाढ्य अशी संस्था असून रोमचा पोप तिचे सर्व सूत्रचालन करीत असतो. गेल्या शतकाच्या अखेरीला फ्रान्समधील धर्मगुरूंच्या सर्व कारस्थानांचा तोच सूत्रधार होता. रूसो, व्हाल्टेअर यांनी घडविलेल्या क्रान्तीनंतरही फ्रेंच समाज फारसा बदललेला नव्हता. तो पूर्वीसारखाच अंधश्रद्ध, भोळसट, भावनावश व चलचित्त असाच होता. या मनोवृत्तीचा फायदा घेऊन मार्टिन लूथरच्या काळाप्रमाणेच पापमुक्ततेचे पास, मोक्षदायक पत्रके विकण्याची प्रथा जेसुइट धर्मगुरूंनी पुन्हा सुरू केली व त्यांतून अमाप पैसा उकळला. देवदेवतांचे उत्सव करणे, त्यांतून चमत्कार, जादूटोणा निर्माण करणे च त्यांच्या साह्याने भाविक लोकांकडून बडवे, पंडे यांच्याप्रमाणे पैसा काढणे हाच त्यांचा धंदा होता. आणि तो चालावा म्हणून सर्व शिक्षण क्षेत्र विशेषतः प्राथमिक शिक्षण आपल्या ताब्यात घेऊन बालमनावर अंधश्रद्धेचे, शब्दप्रामाण्याचे, कर्मकांडात्मक जडधर्माचे दृढ संस्कार करण्याचे धोरण त्यांनी अवलंबिले होते आणि त्यात ते यशस्वीही झाले होते.
 एमिल झोला अशा या क्रूर, धर्महीन, सत्यहीन, भ्रष्ट रोमन कॅथॉलिक धर्मसत्तेचे स्वरूप एमिल झोला याने 'ट्रूथ' या आपल्या सुविख्यात कादंबरीत चित्रिले आहे. या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करणारा लेखक अर्नेस्ट व्हिजेटेली याने प्रस्तावनेत म्हटले आहे की, 'अठराव्या शतकाच्या अखेरीस रूसोने जसे 'नॉव्हेली हिलॉइस', 'काँट्रक्ट सोशल' व 'एमिली' हे ग्रंथ लिहून जगाला वळण लावले त्याचप्रमाणे एकुणिसाव्या शतकाच्या अखेरीस एमिल झोला याने 'फेकंडाइट' 'ट्रॅव्हेल' व 'व्हेरिटी' हे ग्रंथ लिहून पुन्हा एकदा जगात परिवर्तन घडवून आणले, त्यातला व्हेरिटी हा ग्रंथ म्हणजेच 'ट्रूथ' ही कादंबरी होय.
 अनैसर्गिक गुन्हे त्यावेळी फ्रान्समध्ये दोन प्रकारच्या प्राथमिक शाळा होत्या. लोकसत्तावादी, बुद्धिवादी लोकांनी चालविलेल्या निधर्मी पंथाच्या आणि कॅथॉलिक जेसुइट पंथाच्या शाळा हे ते प्रकार होत. या शालेय विश्वाच्या पार्श्वभूमीवरच ही कादंबरी लिहून या दोन पंथांतील संघर्षाचे चित्रण झोलाने केले आहे. मेलिबॉइस या साधारणपणे दोन हजार वस्तीच्या गावी. या दोन्ही शाळा असून त्यातील

३४
साहित्यातील जीवनभाष्य