पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





२ भि न्न व र्गां चे जी व न



 भिन्न संस्कृतींचे तौलनिक दर्शन घडवून थोर साहित्यिक त्यांचे मर्म कसे उकलून दाखवितात ते आपण पाहिले. आता मानवी जीवनाच्या दुसऱ्या एका अंगाकडे वळू. समाजात आर्थिक स्थिती, सामाजिक विषमता, धर्मपंथादि भेद यांमुळे समाजाचे मिन्न वर्ग झालेले असतात. या वर्गांच्या जीवनाचे दर्शन घडवून साहित्यिकांनी त्यावर भाष्य कसे केले आहे ते आता पहावयाचे आहे. भांडवलदार, जमीनदार, मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, यांचे जीवन, स्त्रीजीवन, दलितजीवन, उपेक्षितांचे जीवन, अस्पृश्य, आदिवासी, गुलाम यांचे जीवन हा साहित्याचा फार मोठा विषय आहे. आणि अनेक थोर साहित्यिकांनी आजपर्यंत यांतील कोठले ना कोठले जीवन निवडून त्याचे आपल्या ललित कृतीत विवरण केले आहे. जगातल्या नामवंत कवींनी या विविध वर्गीच्या जीवनाचे सम्यक् दर्शन कसे घडविले आहे ते आता पहावयाचे आहे.
 १ भांडवलदार हेन्रिक इब्सेन यांचे नाव आता जगातल्या प्रत्येक सुशिक्षित मनुष्याला माहीत झालेले आहे. त्याने आपल्या 'पिलर्स ऑफ सोसायटी' या नाटकात भांडवलदार वर्गाचे- त्याचा धनलोभ, त्याची भोगलालसा, त्यांची कारस्थाने त्यांचा पाताळयंत्री कारभार जनतेला फसविण्याचे व तिची पिळणूक करण्याचे त्यांचे कसब, त्यांची उलट्या काळजाची वृत्ती- या सर्वांचे अत्यंत भेदक असे चित्रण केले आहे. कारस्टन बर्निंक हा नॉर्वेमधला जहाजाचा कारखानदार समुद्रकिनाऱ्याला वाहतुक करणारी त्याची कंपनी होती. त्या किनाऱ्याच्या टापूत रेल्वेमार्ग तयार करणे गावाच्या फार फायद्याचे होते. पण त्यामुळे बोट वाहतुक कंपनीचा धंदा बसला असता. म्हणून बर्निकने आपल्या इतर संचालकांच्या साह्याने ती योजना हाणून पाडली. आणि वर्षभराने रेल्वे दुसऱ्याच एका टापूतून न्यावयाचे ठरवून तसा ठराव पास करून घेतला. आणि लगेच तातडीने संकल्पित रेल्वे मार्गाच्या भोव

भिन्न वर्गांचे जीवन
३१