पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्रान्तिकारकांना वाईट वाटत असे. कर्तव्यात आपण चुकलो अशी रुखरुख त्यांना लागे. तत्त्वज्ञानाची, धर्माची निशा ही मद्याच्या निशेपेक्षा शतपटीने जास्त घातक असते, हे डिकन्सने या कादंबरीत उत्तम रोतीने दाखविले आहे.
 क्रान्तीला मूर्तरूप आणि ते सर्व कलात्मक पद्धतीने अमूर्त तत्त्वांना मूर्तरूप देऊन, सार्वजनिक समस्या कौटुंबिक जीवनात गुंतवून, अखिल समाजाचे जीवन ज्यांच्या चरित्रांतून दिसेल अशा व्यक्तिरेखा निर्माण करून आणि सर्वत्र त्यांच्या सुखदुःखाच्या, रागद्वेषाच्या कथेचा धागा अनुस्यूत ठेवून मुळात ही दोन नगरींची कथा असली तरी, ती कथा वर्णावी व क्रान्तीचे रूप दाखवावे असा आपला स्पष्ट हेतू लेखकाने व्यक्त केला असला तरी, वाचकांना प्रत्यक्षात ती एव्हरमांड, मॅनेट, व डेफार्ज या घराण्यात, त्या कुटुंबीयांची कथा दिसते. ई. एम्. फॉर्स्टर या कादंबरी विषयी लिहिताना म्हणतात की, 'काही साध्या, सामान्य व्यक्तांच्या कौटुंबिक जीवनात एवढ्या प्रचंड, भयानक राष्ट्रीय घटनेचे धागे अशा रीतीने गुंफले आहेत की, एक दुसऱ्याचा अविभाज्य घटक आहे असे वाटावे. अशा तऱ्हेची दुसरी कादंबरी माझ्या वाचनात नाही.'
 फ्रेंच क्रान्तीचे इतिहास अनेकांनी लिहिले आहेत. पण न्याय, कायदा, विवेक, तारतम्य, समतोल या गुणांनी संपन्न इंग्लिश मन आणि अविवेक, निरर्गलता, उन्माद, विकारवशता यांनी पिसाट बनलेले फ्रेंच मन यांचे इतके भेदक दर्शन कोणी क्वचितच घडविले असेल.
 रजपूत आणि मराठा हरिभाऊ आपटे यांनी आपल्या उषःकाल या कादंबरीत रजपूत मन आणि मराठा मन यांच्यातील भेद असाच विशद करून दाखविला आहे. प्रत्येक समाजाची काही मूल्ये ठरलेली असतात. त्या मूल्यातील भेदामुळेचं समाज परस्पराहून भिन्न होतात. त्यामुळेच त्यांचे भवितव्य बदलते. या मूल्यांचे रूप स्पष्ट करून त्यांचा तरतमभाव दाखविणे व त्यांवर आपला अभिप्राय, त्याविषयीचा आपला दृष्टिकोण आविष्कृत करणे हेच कवीचे कार्य असते. जीवनभाष्य ते हेच: 'उषःकाल' कादंबरीत हरिभाऊंनी रजपूत व मराठे यांच्या संस्कृतीतील भिन्न मूल्यांना याच हेतूने सरूप केले आहे.
 विवेकहीन शक्ती भारतावरील मुस्लीम आक्रमणाला प्रथम रजपुतांनी तोंड दिले. आणि पुढे अनेक शतके त्या आसुरी सत्तेशी मोठ्या शौर्याने व धैर्याने लढा दिला. पण त्या सत्तेची पाळेमुळे खणून तिचे निर्दाळण करण्यात त्याना यश आले नाहीच तर उलट अखेरीस सर्व राजस्थानच नामोहरम होऊन त्याला मुस्लीमांचे मांडलीकत्व पतकरावे लागले आणि त्यांना आपल्या कुलकन्या देऊन सूर्यचंद्रवंशाच्या कीर्तीला कलंक लावून घेण्याचे त्यांच्या नशिबी आले ! याचे कारण काय ? रजपुतांच्या ठायी शौर्य होते, शक्ती होती. पण तिला युक्तीची जोड नव्हती. ते अत्यंत साहसी होते. पण त्या साहसामागे विवेक नव्हता. त्यांनी त्यांच्या स्त्रीपुरुषांनी सहस्त्रसंख्येने मृत्यूला कवटाळले पण ते विजयासाठी केलेले

संस्कृतिदर्शन
२५