पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळात तो फ्रांसमध्ये गेल्यावर तेथेही त्याच्यावर खटला झाला. या दोन प्रसंगीच्या न्यायसमेची चित्रणे करून डिकन्सने त्या दोन नगरीची संस्कृती कशी कमालीची भिन्न होती, ते अत्यंत स्पष्ट केले आहे. त्याच्या ललितकलेचे सर्व वैभव या दोन चित्रांवरून दिसून येते. चार्लस डानें हा मूळचा फ्रेंच फ्रान्समधला एक अत्यंत जुलमी, क्रूर, मदांध सरदार एव्हरमांड यांचा हा पुतण्या. पण तेथील सरदारांचे भयानक अत्याचार, जुलूम यांना विटून सर्व जिंदगीवर पाणी सोडून, मायभूमीही टाकून आणि मूळच्या नावाचाही त्याग करून चार्लस इंग्लंडला आला. व तेथेच स्थायिक झाला. इंग्लंडला येताना बोटीवर त्याची डॉक्टर मॅनेट व त्यांची मुलगी लूसी यांच्याशी गाठ पडली व ओळख झाली. डॉ. मॅनेट हे फ्रेंच असून वीस वर्षापूर्वी एक मोठे भिषग्वर म्हणून त्यांची फ्रान्समध्ये कीर्ती होती. सरदार एव्हरमांड बंधूंनी एका स्त्रीवर बलात्कार करून तिला मारून टाकली होती. तो अन्याय पंचविण्यास डॉ. मॅनेट त्यांना मदत करीनात. उलट ते त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू लागले म्हणून एव्हरमाडनी त्यांना बॅस्टिलच्या तुरुंगांत डांबून टाकले. त्यांची पत्नी या धक्क्याने मृत्यू पावली. त्यावेळी त्यांचे इंग्लिश मित्र लॉरी यांनी त्यांची दोन वर्षाची मुलगी लूसी हिला इंग्लंडला नेले व तेथेच तिचे संगोपन केले. १७७५ साली डॉ. मॅनेट यांचा मित्र डेफार्ज याने त्यांना काही युक्तीने सोडवून आपल्या घरी आणले. पण वीस वर्षे अंधारकोठडीत काढल्याने ते जवळजवळ वेडे झाले होते. लूसी आता मोठी झाली होती. तिला सर्व हकीकत समजली होती. म्हणून लॉरी यांच्याबरोबर पॅरिसला येऊन ती वडिलांना घेऊन इंग्लंडला परत चालली होती. त्याच वेळी तिची व चार्लसची ओळख होऊन पुढे काही वर्षांनी तिचे प्रेमात रूपांतर झाले.
 दोन न्यायालये १७८० च्या सुमारास या चार्लसवर एक आरोप ठेवण्यात आला. अमेरिकेशी त्यावेळी इंग्लंडचे युध्द चालू होते. अशा वेळी अमेरिकेला जाणाऱ्या सैन्यासंबंधीची माहिती चार्लसने फ्रान्स या शत्रूराष्ट्राला पुरविली असा त्याच्यावर आरोप होता. वास्तविक हा राजद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप होता. युध्दाचा काळ होता. अशावेळी माथी भडकून जाऊन वाटेल तो अत्याचार करण्यास लोक प्रवृत्त व्हावयाचे. आणि तसे झाले असते तर चार्लस त्यांच्या हातून जिवंत सुटणे कठिण होते. पण तसे काही झाले नाही. लोक भडकल्याचे, खवळल्याचे, विवेकशून्य झाल्याचे पुसटसुध्दा लक्षण कोठे दिसले नाही. कायद्याच्या काटेकोर कलमा अन्वये न्यायालयात सर्व काम चालले. आरोपीला वकील देण्याची, स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की, संशयाचा फायदा मिळून राजद्रोहासारख्या भयंकर आरोपाखाली असलेला हा चार्लस, त्या युध्दकाळातही, निर्दोष ठरून मुक्त झाला त्याचा वकील स्ट्रायव्हर यांचा मदतनीस सिडने कार्टन याचा व चार्लसचा चेहरा. अगदी सारखा होता. दोहोंत विलक्षण साम्य होते. तेव्हा दोघांकडे बोट दाखवून स्ट्रायव्हरने फिर्यादीचा साक्षीदार बग्साड याला, नेमका गुन्हेगार कोण, असे विचारताच तो

२०
साहित्यातील जीवनभाष्य