पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर खर्च करणारा वाहशहा अगदी मूर्ख असला पाहिजे, या ताजाच्या पायाशी बसून काळ टकमक पाहतो. आपल्याला याचा ग्रास करता येणार नाही हे त्याच्या ध्यानात येते. पण बाजारात जोपर्यन्त त्याची किंमत नाही तोपर्यन्त अर्थस्त्रज्ञांना त्याची किंमत शून्य !
 जन म्हणति सावळी, भयचकित नमावे तुज रमणी, कुणि कोडे माझे उकलिल का? चल जळो ज्ञानविज्ञान गड्या, रुद्रास आवाहन अशा अनेक कवितातून तांबे यांचे प्रेम, क्रान्ती इ. जीवनाच्या अंगांविषयीचे तत्त्वज्ञान व्यक्त झालेले आहे. सर्व संसारच कवीचा विषय असतो आणि त्यांतील प्रत्येक घटना, वस्तू, विचार यांवर कवी आपल्या दृष्टिकोणातून भाष्य करीत असतो, एवढे स्पष्ट करण्यास वरील उदाहरणे पुरेशी असल्यामुळे येथे जास्त विवरण करीत नाही.
 २ पं. महादेव शास्त्री महादेव शास्त्री जोशी यांचे भाववळ, कल्पित आणि सत्य, मोहनवेल, खडकातले पाझर, पुत्रवती इ. आठ दहा लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. प्रत्येकात नऊ दहा कथा आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांनी शंभर एक कथा तरी लिहिल्या आहेत. हा मानवी संसार आपल्याला कसा दिसला ते सांगण्यास एवढ्या साहित्यातून त्यांना विपुल अवसर मिळाला आहे. आणि त्यांनी आपली अनुभूती या कथांमधून सविस्तर प्रगट केलेली आहे.
 जीवनाचे दर्शन घडविले नाही, त्या जीवनाविषयी आपला अभिप्राय व्यक्त केला नाही असा साहित्यिक बहुधा नसतोच. कारण सर्व साहित्यिकांचा मानवी जीवन हा जो विषय तो अर्धा अधिक स्त्रीनेच व्यापला आहे. या जीवानचा स्वरूप निश्चय तिच्यामुळेच होतो. शास्त्रीबुवांच्या अनेक कथा स्त्री जीवनभाष्या- साठीच लिहिल्या आहेत असे दिसते. 'पुत्रवती' ही कथा पहा, ही स्त्री बाळंतपणी अडली. डॉक्टरांनी पतीला विचारले की, 'ऑपरेशन करावे लागेल. त्यातून आई किंवा मूल कोणीतरी एक जगेल. तेव्हा कोणाला वाचवू' पतीने सांगितले की, मूल वाचवा..' ते त्या स्त्रीला कळले, तेव्हा तिला धक्का बसला. आपल्याला स्वतंत्र महत्त्व नाही, पुरुषांच्या लेखी आपण म्हणजे एक वंश वाढविण्याचे साधन, एवढीच आपली किंमत, व हा विचार तिच्या जिव्हारी लागला. ती पतीला म्हणाली, 'हे अनादिकाळापासून ठरलेले आहे. बायकोची गरज तेवढीच. तिनं नवऱ्याचा वंश वाढवायच यांच्या खस्ता खायच्या, आणि मरून जायचं !' पतीने परोपरीने तिची समजूत चालण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते पटले नाही. 'हे आपल्या जिवावर उदार झाले' हा विचार तिच्या काळजात रुतून बसला. तिच्या पतीची दृष्टी तशी नव्हती. पण सामान्यतः पुरुष स्त्रीकडे वंश वाढवायचे साधन म्हणूनच पहातो. यामुळे पुत्रवतीने हाय खाल्ली आणि त्यामुळेच ती मृत्युमुखी पडली.
 'यथा वाचां तथा स्त्रीणां साघुल्वे दुर्जनों जनः ।' हा स्त्रीजीवन विषयक दुसरा सिद्धान्त आहे. खडकातले पाझर, पूर्वग्रह, कसोटी इ. अनेक कथांतून शास्त्री

अंतरंग दर्शन
१२७