पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतानाच तिला वेणा सुरू झाल्या किंवा एखादे ऑपरेशन करताना ती स्वतःच बाळंतीण झाली तर काय करावयाचे ?' अशीही चेष्टा अनेकांनी केली.
 हे जे पुरुषांचे स्त्रीविषयीचे ग्रह, त्यामुळे दृढमूल झालेल्या ज्या रूढी, त्यामुळे स्त्रियांना आलेली पराधीनता, या सर्वांचे हरिभाऊंनी या कादंबऱ्यांत यमुना, ताई दुर्गी, उमाबाई, इ. व्यक्तिरेखा निर्मून चित्रण केले आहे. आणि जागोजाग अनेक प्रसंगांनी स्त्री जीवनाचे दर्शन घडवून रघुनाथराव, शिवरामपंत, भाऊ, यमुना, ताई यांच्या तोंडून त्या जीवनावर भाष्य केले आहे. या दोन कादंबऱ्यांना मराठीत जे अमर स्थान प्राप्त झाले आहे ते यामुळेच होय.
 दलित, पतित लोक व स्त्रिया यांच्या जीवनावरचे भाष्य आपण पाहिले, आता मानवी जीवनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अंगावरील भाष्य पहावयाचे आहे. ते अंग म्हणजे मानवी मनातील 'संघर्ष' हे होय.

स्त्री जीवनभाष्य
९७