पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आला तरी कोणाचं ऐकायची नाही. लोक मला वेस्वा म्हणोत, उठून गेली म्हणोत.' असा तिने आपला कृत निश्चयं प्रगट केला. शिवरामपंतांची मुलगी सुंदरी हिच्या बरोबर ती मिशनच्या शाळेतही जाऊ लागली. त्यामुळे वाटेतल्या टवाळांनी व सासरच्या कारभाऱ्यांनी अत्यंत मर्म भेदक अशी दुरुत्तरे तिला ऐकांवली. पण तिने आपला निश्चय सोडला नाही. त्या दोघींना पाहून बायका तर वाटेल ते बोलत. सुंदरी मोठी झाली तरी शिवराम पंतांनी तिचें लग्न केले नव्हते. हे तर त्याकाळी महापातक होते. त्यामुळे त्या दोघी दिसल्या की, बायका पोरीबाळींना ओरडून सांगत 'बाजूला व्हा. विटाळ होईल तुम्हाला. एकीनं नवरा सोडला आहे, दुसरीनं केलाच नाही. तेव्हां दूर रहा आपल्या रिकामा विटाळ करून घेऊन चोळ्या परकर धुवायला नकोत.'
 ताई यमूच्या एक पायरी पुढे होती. रघुनाथरावांच्या सहवासाने व थोड्याशा शिक्षणाने यमू धीट झाली होती. पण नवे विचार मान्य होणे आणि मुंबईला स्वतंत्र पणे रहात असताना त्यांचा थोडा आचार करणे या पलीकडे ती जाऊ शकत नव्हती. पुण्याला सासरी तसे काही आचरण करण्याचे किंवा नवे विचार बोलून दाखवण्याचे धैर्य तिला नव्हते. मुंबईला जो तिने धीटपणा दाखविला तो सुद्धा 'इकडुन सांगितले म्हणून केले' या स्वरूपाचा होता. त्या मानाने ताई बरीच स्वतः सिद्ध झाली होती. तिने नवे संस्कार स्वतः तर पचविलेच. पण त्याचा समाजात प्रसार करावा ही ही हिंमत तिच्या ठायी आली होती. मिशनरी बायका परोपकारात आपले आयुष्य घालवितात, कोणास काही शिकवितात, कोणाला औषधपाणी देतात, कोणाची शुश्रूषा करितात त्याप्रमाणे आपण करावे अशी तिची वसुंदरीची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे त्या दोघींनी काम सुरूही केले होते. आरंभी अर्थातच त्यांना फार विरोध झाला, पण हळूहळू त्यांच्या विषयी लोकांचे मत निवळू लागले व काम सुकर होऊ लागले.
 विवाहावाचून ? स्त्रिया लिहू वाचू लागल्या, सभेला जाऊ लागल्या तर त्याला समाजाचा एवढा विरोध का असावा ? एकतर त्यामुळे स्त्री स्वतंत्र होईल, स्वतः सिद्ध होईल, पुरुषाच्या नियंत्रणात राहणार नाही, अशी लोकांना भीती वाटत होती. पण तेवढेच कारण नव्हते. यामुळे बहकून जाऊन स्त्री अनाचारी होईल, तिला कसले ताळतंत्रच राहणार नाही, असा लोकांच्या व त्यांच्या अप्तांच्या मनात धसका होता. शिवरामपंतांनी सुंदरीला अविवाहित ठेवावयाची असे ठरविले होते. 'तेव्हा त्यांच्या अगदी जवळच्या मित्राने सुद्धा त्या विचाराचा निषेध केला. 'यामुळे उद्या तिचे वाकडे पाऊल पडले तर त्याला जबाबदार कोण ?' असे तो म्हणाला. त्यावर शिवरामपंत म्हणाले 'अहो बाल वयात लग्न होऊन मुलीला पुष्कळ वेळा वर्ष दोन वर्षांतच वैधव्य येते. त्यानंतर मग तिचे वाकडे पाऊल पडू नये म्हणून समाजाने काय चिंता वाहिली आहे ? त्या स्थितीत जशी ती नीट राहते तशी या स्थितीतही राहील.' अर्थात त्यावेळी हे कोणाला पटणे शक्य नव्हते. भाऊ आणि ताई यांच्या आजीला तर यांहून ही भयंकर शंका आली होती. सासर सोडून

स्त्री जीवनभाष्य
९५