पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असते. असे मुळीच नाही. पण तरीही ती एका त-हेने 'निवड' असते; कारण त्या एका मार्गाशिवाय इतर मार्गांनी जाण्याची शक्यता असते. मार्गांची अनेकता व त्यांतील एकाची (यदृच्छया का होईना) निवड ही माणसाची वैशिष्ट्ये होत. ह्याखेरीज मानवाने काही सांस्कृतिक गरजा निर्माण केल्या आहेत. वर काही मूलभूत गरजा सांगितल्या, त्या काही दृष्टींनी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. चार लोकांनी चांगले म्हणावे, चार लोकांसारखे वागावे, माठ्यांचे अनुकरण, हुकमत गाजवून काहींचे. का होईना पुढारीपण असावे अशा इच्छा, वगैरे आणखी कितीतरी अशा गरजा आहेत की, त्या समाजात राहण्यामुळे, सांघिक जीवनामुळे निर्माण झालेल्या आहेत. ह्याही गरजा लभूत व इतर प्राणी व मनुष्य ह्यांना साधारणच आहेत. पशुपक्ष्यांमध्येही पसल सर्व त-हांच्या गरजांपासून उत्पन्न होणा-या क्रिया, प्रतिक्रिया दिसून पतात. ज्यांना सांस्कृतिक गरजा म्हटले, त्या ह्यांखेरीज निराळ्याच व प्याला विशिष्ट, इतर प्राण्यांना नाहीत, अशा असतात. संस्कृती म्हणजे ५. संस्कृती म्हणजे वर्तमानकाळाला श्रीमंत करणारी भूतकाळाची कर्तबगारी. म्हणून मागील पिढीकडून मिळालेले असेल, - घरे दारे, रस्ते, शहरे, सचय, इमारती, समाजसंस्था, दैवते, श्रद्धास्थाने, हे सर्वच संस्कृतीत "त. त्याचप्रमाणे संस्कृती म्हणजे वर्तमानकाळाभोवती भूतकाळाचा पडलेला पाश, स्वैर वागण्याला पडलेल्या मर्यादा, नवीन कल्पना, नवीन प्रयोग या गळचेपी करणारे पिशाच्च. सांस्कृतिक गरजा किंवा इच्छासुद्धा तीव्र पात. त्यांची पकड इतकी घट्ट असते की, प्राणी म्हणून असलेल्या पाच्या मूलभूत गरजांचाही विसर पडतो. जीवशास्त्र सांगते की, जगणे, 37 प्रजोत्पादन ह्या जीवसृष्टीच्या तीन गरजा आहेत. पण माणूस "O, प्रमासाठी, देशासाठी, अपमान झाला म्हणून, पावित्र्याचा भंग ला म्हणून प्राण चुटकीसारखे देतो व घेतोही. इंद्रियनिग्रह करून कडकडीत वय पाळतो व प्रजोत्पादन करावयाचे नाकारतो. फार काय, जैन धर्मातील + लोक उपास करून भुकेने तडफडून प्राणही सोडतात. मोक्ष हा तर सर्वस्वी सांस्कृतिक गरज आहे. आपल्याकडे जे चार पुरुषार्थ कित्येक लोक उपास करून ८५ ।। संस्कृती ।।