पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिचा प्रतिकार केला. सबंध महाभारतात त्यांच्या तोंडी शब्द नाही. पांडू मेल्यावर सत्यवतीच्या सांगण्यावरून दोघी सासूबरोबर वनवासात गेल्या व तेथेच मेल्या. ___ ज्या तीन बायकांच्यामुळे महाभारत कथेला जन्म मिळाला त्या ह्या तीन दुर्दैवी बायका. नशिबाने योजून ठेविलेले आपआपले कार्य त्यांनी कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे उठविले. त्या निव्वळ यांत्रिक पराधीन आयुष्य जगल्या. हे आयुष्य अशा त-हेचे होते की त्यांच्या कृत्याला चांगले-वाईट अशा त-हेचे नैतिक मूल्यच देता येत नाही. RANDAR - १९७१ ।। संस्कृती ।।