पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कठोर बंधन पाळणा-या खिश्चन समाजातसुद्धा कैक शतके स्त्री गुलामच होती. स्त्रियांच्या गुलामगिरीचा प्रश्न हा नव-यांच्या अगर बायकांच्या संख्येच्या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न आहे. हीच गोष्ट समाजरचनेत आहे. पैतृक परंपरेच्या समाजात मुलगी पतीकडे नांदावयाला जाते, आणि तिची मुले पतीच्या वंशात जातात. तेथे पुरुष कर्ता असतो. मातृपरंपरेत मुले आईच्या वशात असतात, स्त्री आईच्या घरी राहते, नवरा मधूनमधून भेटीला येतो. पण अशा समाजातसुद्धा कर्ता पुरुष नरच असतो; फक्त तो बाईचा मामा किंवा बाईचा भाऊ असतो. या सावध पद्धतीमुळे इरावतीबाई पुष्कळदा एकदम धक्का बसावा, असे पवचन करताना आढळतात. त्यांना स्वतःला सवत सहन झाली असती की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. पण एकापेक्षा अधिक बायका असणे हा गुन्हा आहे, असे मात्र त्यांना वाटत नव्हते. पत्नींच्या संख्येवरून वासनेचे जाधिक्य ठरवावयाला त्या तयार नव्हत्या. त्यांच्या मते बहुपत्नीत्व किंवा पपातकत्व ही चालरीत होती. ती असावी किंवा नसावी, हे ठरविण्याचा समाजाला अधिकार होता; परंतु त्याचा गुन्हा म्हणून विचार करणे बरोबर MRI. कुटुंबाच्या जायदादीत लग्न झालेल्या बायकांना आणि रखेल्यांनाही वकार असावे व प्रथेने मान्य केलेल्या वैध विवाहसंबंधात संततीला जे पकार आहेत, तसेच परस्परांनी मान्य केलेल्या, पण अवैध संबंधांतील नालाही अधिकार असावे, असे त्यांना वाटे. त्यांना संधी मिळाली सता, तर पत्नीच्या संमतीने पतीने नियोगाची सोय करावी व क्षेत्रज पर अधिकार सांगावा असे प्रतिपादन त्यांनी केले असते. हिंदूंच्या या रचनचा विचार पावित्र्याच्या पातळीवर करण्यास त्या तयार नव्हत्या, त्या समाजरचनेत बदल घडविताना आपण अपवित्राच्या जागी पवित्र, साच्या जागी नैतिक स्थापन करीत आहो, असेही त्यांना वाटण्याचे नव्हते. नर आणि मादी एकत्र आली; म्हणजे संतती निर्माण होतेच, नाचा व्यवस्था सर्वांना सोयीची कशी होईल, या बेताने त्या संस्कृतीच्या तळावर बसवू इच्छित होत्या. त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न सोयीचा होता, १३१ ।। संस्कृती ।।