पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय तिसरा अर्जुन उवाच - ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥ सम०--कर्माहुनी बुद्धि थोर तुज वाटे जनार्दना । तरि कां घोर कमीं या योजिसी मज केशवा ॥ १ ॥ आर्या--- हे केशवा तुलाही कर्माहुनि बुद्धि भासती थोर । तरि कां जनार्दना मज करवीशी कर्म हैं महाघोर ॥ १ ॥ ओवी - अर्जुन म्हणे कृष्णनाथा । कर्माहून ज्ञान श्रेष्ठ असतां । अघोरकर्मी कां अनंता । प्रवर्तवितोसि मज ॥ १ ॥ मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसिलें | कमळापति ॥ १ ॥ तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें श्रीअनंता । निश्चित जरी ॥ २ ॥ तरी मातें केवीं श्रीहरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसी ना महाघोरीं । कमीं सुतां ॥ ३ ॥ हां गा कर्म तूंचि अशेख । निराकरिसी निःशेख | तरी मजकरवीं हैं हिंसक । कां करविसी ॥ ४ ॥ तरी हेंचि विचारी श्रीहपीकेशा । तूं मानु न देसी कर्मलेशा। आणि येसणी हे हिंसा । करवीत आहासी ॥ ५ ॥ व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमामुयाम् ॥ २ ॥ सम०--व्यामिश्रवाक्यें बुद्धीतें करिसी मोहियापरी । एक नेमुनि तें सांग पार्वे मी श्रेय ज्यास्तव ॥ २ ॥ आर्या - संदिग्ध बोलसी कां बुद्धिस जो ठकविणार त्या वाणी । पावें मी श्रेय असी निश्चित मज सांग एक तूं वाणी ॥२॥ ओंवी -- मिश्रितवाक्यें येणें । भुलविसी माझी अंतःकरणें । तरी एक निश्चयेसीं सांग ज्याणें । श्रेय पाविजेल ॥ २ ॥ मग अर्जुन म्हणाला – “ हे लक्ष्मीपते देवा, तुम्हीं जें बोललां, तें मी लक्षपूर्वक ऐकिलें. १ तेव्हां विचार केला असतां कर्म आणि कर्ता हे उरत नाहींत, असें जर तुमचें ठाम मत असेल, २ तर मग ' पार्था, लढाई कर, ' असें मला कसें म्हणतां ? या भयंकर कर्मात मला ढकलतांना, तुम्हांला शंका कशी वाटत नाहीं ? ३ देवा, हे पहा, तुम्हींच सर्व कर्माचा निःशेष निषेध करतां, तर मग माझ्या हातून हें घातक मारेकऱ्याचें काम कां करवितां ? ४ म्हणून, हे हृषीकेशा, माझा प्रश्न असा आहे, कीं, कर्माचा अल्पांशही तुम्हांला मान्य नाहीं आणि पुन्हां माझ्या हातून एवढी मोठी हिंसा करवीत आहां, तेव्हां हा असंबद्धपणा तरी कोठला ? ५ १ घालतो, गुंतवितो.