पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा 1 ७१ सांगतुसे अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥ ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें । आतां आमुचिया काजा कीर आलें । उपपत्ति इया ॥७१॥ जें कर्मजात आघवें । एथ निरोकारिलें देवें । तरी पौरुपलें म्यां झुंजावें । म्हणूनियां ॥ ७२ ॥ ऐसा श्रीअच्युताचिया वोला । चित्तीं धनुर्धर उवयिला | आतां प्रश्नु करील भला । आशंकोनी ॥ ७३ ॥ तो प्रसंगु असे नागरुँ । जो सकळ धर्मासि आँगरु । कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ७ ॥ जो आपण सर्वज्ञनाथु । निरूपिता होईल श्रीअनंतु । ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदा ॥ ३७५ ॥ ब्राह्मी स्थिति श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्वतः कथन केली, असें संजय म्हणाला. ३७० हें श्रीकृष्णाचे भाषण ऐकून, अर्जुन आपल्या मनांत म्हणाला, " ही श्रीकृष्णांची विचारसरणी माझ्याच पथ्यावर पडली ! ७१ कारण, जर कृष्णांनीं सर्वत्र कर्माचा निषेध केला आहे, तर मग ' मी लढावें, ' या गोटीला अगदी टाळाच मिळाला ! " ७२ याप्रमाणे श्रीकृष्णांच्या भाषणानें अर्जुन मनांत फुशारला, आणि कांहीं शंका घेऊन तो आतां श्रीकृष्णांला प्रश्न करील. ७३ तो प्रसंग फारच सुंदर आहे. जो सर्व धर्माचं माहेर किंवा विवेकामृताचा अगाध व अफाट समुद्रच वाढतो, ७४ व ज्याचे निरूपण स्वतः सर्वज्ञश्रेष्ठ श्रीकृष्ण करितील, तो संवाद हा श्रीनिवृत्तिनाथांचा दास ज्ञानदेव कथन करील. ३७५ १ निराकरण केले. २ निषिद्ध ठरलें. ३ संतोषला ४ शंका घेऊन. ५ सुंदर, मोहक ६ मळा, उत्पत्तिस्थान,