पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ७३ देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणतीं काय करावें । आतां संपलें म्हणों पां आघवें । विवेकाचें ॥ ६ ॥ हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां विसा । आत्मवोधाचा ॥ ७ ॥ वैद्यु पथ्य वरूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये | सांगें मज ॥ ८ ॥ जैसें आंधळे सुइजे ऑव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा | वोडवला आम्हां ॥ ९ ॥ मी आधींच कांहीं नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । श्रीकृष्णा विवेक या कारणें । पुसिला तुज ॥ १० ॥ तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजी गोवाई | तरी अनुसरलेया काई । ऐसें कीजे ॥ ११ ॥ आम्हीं तनुमनु- जीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरले म्हण ॥ १२ ॥ आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥ १३ ॥ तरी ये जाणिवेचे कीर सरलें । परी आणीक एक असे जाहलें । जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥ १४ ॥ तेवींचि श्रीकृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे | जरी चित्त पाहसी माझें । येणें मिपें ॥ १५ ॥ तरी झकवीतु आहासी मातें । कीं तत्त्वचि कथिलें ध्वनितें । हें अवगमितां निरुतें । मला तर देवा, तुम्हींच जर असें घोटाळ्यानं बोलूं लागलां, तर आमच्यासारख्या अज्ञानी माणसांनी काय करावें ? आजमितीस विवेक सर्वस्वीं बुडालाच कीं काय ? ६ आतां असें बोलणें हा जर सदुपदेश म्हणावा, तर मग भ्रष्टपणा तो काय निराळा असतो ? आज आमची आत्मबोधाची हौस पुरली खरी ! ७ वैद्यानें पथ्य सांगितलें, पण त्यानेच जर रोग्याला औषधांतून विष घातलें, तर मग तो रोगी जगावा तरी कसा, सांगा पाहूं ? ८ जसें आंधळ्याला आडवाटेला घालावें, किंवा माकडाला अंमली दारू पाजावी, तसाच हा मोठा सुंदर उपदेश आम्हांला लाभला म्हणावयाचा ! ९ आधीच कांहीं कळत नव्हतें. तशांत ही मोहाची बाधा झाली, म्हणून, हे श्रीकृष्णा, तुम्हांला सुविचार विचारला. १० तों तुमची कांहीं निराळीच तन्हा ! तुझ्या उपदेशांतच घोटाळा ! मग त्याला अनुसरून काय बरे होईल ? ११ आम्हीं मोठ्या जीवाभावानें तुमच्या वचनावर भार टाकला, आणि तुम्हीं जर असें करणार, तर सर्वच कारभार आटोपला म्हणावयाचं ! १२ आतां तुम्हीं असें केलेंस म्हणजे आमची शोभाच केलीत म्हणावयाचें ! अशा स्थितीत आम्हीं ज्ञानाची आस कशाला धरावी ?" असें अर्जुन म्हणाला. १३ तो पुढं म्हणाला, “ ज्ञानाची तर अशी वाट लागलीच ! पण आणखी एक वाईट गोष्ट अशी झाली आहे, कीं, माझें शांत असलेलं मन आतां पार ढवळून गेलें आहे. १४ तसेंच, देवा, तुमचं चरित्र अगम्य आहे; आतां जर हा बहाणा करून तुम्हीं माझी परीक्षा पाहात असाल, १५ तर तुम्ही आम्हांला थापा मारून चकवीत आहां, कीं या गूढ प्रकारानं खरोखर कांहीं महत्त्वाच्या १ छवि, उत्कंठा २ विवरून सांगून, स्पष्ट करून ३ जिवंत राहील. ४ आडवाटेला. ५ दारू वगैरे अमली पदार्थ. ६ लोटला, आला. ७ सगळाच कारभार आटोपला. ८ अस्पष्ट व्यंग्य शब्दांनी ९ समजून घेण्याचा यत्न करूनही. १० खरें, १०