पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० सार्थ श्रीज्ञानेश्वरी महामुखीं ॥ ६२ ॥ जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पांवळें म्हणे । तो केवीं रंजे पालिवणें । भिलांचेनि ॥ ६३ ॥ जो अमृतासी ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ६४ ॥ पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं । तेथ ऋद्धिसिद्धि काय । प्राकृता होती ॥ ६५ ॥ विहाय कामान् यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः । निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति ॥ ७१ ॥ सम० - टाकून सर्व कामांतें भोगितो भोग निस्पृह । मी माझें हें नसे ज्याला तो ज्ञानी शांति पावतो ॥ ७१ ॥ आर्या-- टाकुनि सर्वहि कामा निस्पृह होउनि जनांत जो जोगी । निर्मम निरहंकारी पावे तो शांति साधनाजोगी ७१ ओवी - सर्व काम सांडूनी । संगत्यागे निस्पृह होऊनी । मोह अहंकार त्यजुनी । शांति पावे ॥ ७१ ॥ ऐसा आत्मबोधें तोखला । जो परमानंदें पोखला । तोचि स्थिरप्र भला । वोळख तूं ॥ ६६ ॥ तो अहंकारातें दंडुनी । सकळ कामु सांडुनी | विचरे विश्व होऊनि । विश्वामाजी ॥ ६७ ॥ एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥७२॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः । सम० -- हे स्थिति ब्रह्मिची पार्था न मोहे ईस पावतां । अंतकाळीं इच्या योगें क्षणंही मुक्ति पावतो ॥ ७२ ॥ आर्या--धरि जो ही ब्रह्मि स्थिति मोह न त्या न मिति त्यासि निर्वाण । अंतींही धरि जो ही पावेल ब्रह्म तोचि निर्वाण ७२ ओंवी--अशा ब्रह्मीं स्थिति वर्तती । मोहरूप संसार न पावती । देहावसानीं स्मरती । ते मुक्त जाण ॥ ७२ ॥ हे स्थिति निःसीम । जे अनुभविती निष्काम । ते पावले परब्रह्म | अनायासें ||६८ ॥ चिद्रपी मिळतां । देहांतीची व्याकुळता । आड ठाकों न सके चित्ता । प्राज्ञा जया ।। ६९ ।। तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति । आपला आपल्या आत्मानंदाच्या परमसुखांत मग्न झालेला असतो. ६२ जो आपल्या घराची शोभा पाहून, इंद्राच्या वसतिगृहालाही तुच्छ समजतो, तो पानानं शाकारलेल्या भिल्लाच्या खोपटाला कसा भुलणार? ६३ जो अमृतालाही नांव ठेवण्याइतका चोखाळ आहे, तो जसा पेजेचा स्वीकार करीत नाहीं, तसा ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला आहे तो लौकिक वैभवाच्या उपभोगाची मुळींच किंमत मानीत नाहीं. ६४ अर्जुना, अरे, जेथें प्रत्यक्ष स्वर्गसुखाचीही पर्वा नाहीं, तेथे या क्षुद्र लौकिक ऋद्धिसिद्धींना विचारतो कोण ! ६५ तेव्हां ज्याला असा आत्मज्ञानाचा लाभ लाभला आहे, जो आत्मस्वरूपाच्या अखंड आनंदानें पुष्ट झाला आहे, तोच खरा 'स्थितप्रज्ञ' हें तूं समज. ६६ तो अहंकाराचा मद झाडून टाकतो, सर्व कामनांचा त्याग करितो, आणि स्वतःच विश्वरूप होऊन, या विश्वांत परमानंदांत राहात असतो. ६७ हीच अप्रतिम व अमर्याद 'ब्राह्मीस्थिति' समजावी. हिचा अनुभव घेणारे निष्काम पुरुष, कोणतेही कष्ट न करितां परब्रह्माला पावतात. " ६८ चैतन्यरूपाशीं एकजीव होत असतां, मरणकाळी होणारी अंतःकरणाची चलबिचल जिच्यामुळे स्थितप्रज्ञाला आडवू शकत नाहीं, ६९ तीच ही १ उतम संस्कृतीने व रसिकतेनें. २ गचाळ, गाबाळ. ३ पालें, पाना डाहाळ्यांची झोंपड़ी. ४ नांवे ठेवतो, खोड्या ठेवतो, ५ हिशेबांत घेण्यासारखें, किंमतीचें