पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ६९ या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ६९ सम• ब्रह्मनिष्ठां निशा लोकां जागे हा तेथ संयमी । विषय जागती लोक या द्रष्टया जशी निशा ॥ ६९ ॥ आर्या- सकळां भूतांची जे निशा तयेमाजि संयमी जागा । जागति भूतें जीत द्रष्टृमुनीची निशा पहा जा गा ॥६९॥ ओवी - जे रात्री सर्वभूतीं । ते समयीं योगी जागती । जेथे भूतांची जागृती । ते रात्री मुनींसी ॥ ६९ ॥ देखें भूतजात निदलें । तेथेंचि जया पोहलें । आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रितु जो ॥ ५५ ॥ तोचि तो निरुपाधि | अर्जुना तो स्थिरबुद्धिं । तोचि जाणें निरवधि | मुनीश्वर ॥ ५६ ॥ आपूर्यमाणमचलप्रतिष्प्रं समुद्रमापः प्रविशति यद्वत् । तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ ७२ ॥ सम० - नाना जळांचा जलधींत मेळा | मिळे नुलंघी तरि सिंधुवेळा ॥ भोग स्वतःप्राप्त असेचि भोगी । तो पावतो शांति न कामसंगी ॥ ७० ॥ आर्या - जलपूर्णा सिंधुमधीं न शिरायाला जलौध तो मुकतो । arita तेवि ज्यामधिं पावे तो शांतिला न कामुक तो ॥ ७० ॥ ओवी - - संपूर्ण समुद्री जाण । तेथे उदक जाय मिळोन । तेंवी कामनालीन। शांति पावे ॥ ७० ॥ पार्था आणीकही परी । तो जाणों येईल अवधारीं । जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ५७ ॥ जन्ही सरितावोध समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तही अधिक नोहे ईपत् । मर्यादा न संडी ॥ ५८ ॥ ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता । परी न्यून नव्हे पार्था । समुद्र जैसा ॥ ५९ ॥ तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी । आणि न पवतां न बाधी । वृति तयातें ॥ ३६० ॥ सांगें सूर्याच्या घरीं । प्रकाशु काय तवेरी । कीं न लविजेचि तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ६१ ॥ देखें ऋद्धि सिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । अरे, ज्या ब्रह्मवस्तूसंबंधं सर्व भूतमात्र निःशंकपणे जणूं काय निजलेलेंच असतें, त्या ब्रह्मवस्तू- संबंधें जो निरंतर जागा राहातो, आणि ज्या विषयांसाठी हे जीवमात्र जागेपणानें धडपडत असतात, त्या विषयांकडे जो अगदी डोळे मिटतो, ५५ तोच खरा उपाधींतून सुटला, तोच खरा 'स्थितप्रज्ञ ' आणि तोच सर्वस्वी श्रेष्ठ मुनि ठरतो. ५६ पार्था, अशा पुरुषाला ओळखण्याची आणखीही एक खूण आहे. समुद्राचा गंभीरपणा अबाधित असतो. ५७ जरी सर्व नद्यांचे ओघ दुथडी भरून समुद्राला मिळतात, तरी तो यत्किंचितही वाढून आपली मर्यादा ओलांडून जात नाहीं. ५८ किंवा उन्हाळ्यांत जरी सर्व नद्या आटून गेल्या, तरीही तो समुद्र रतीभरसुद्धां कमी झालेला आढळत नाहीं, ५९ त्याप्रमाणेंच ' स्थित- प्रज्ञाला' सर्व ऋद्धिसिद्धि प्राप्त झाल्या तरी त्याच्या बुद्धीची चलबिचल होत नाहीं, किंवा त्या प्राप्त न झाल्या तरीही त्याचा धीर गळत नाहीं. ३६० अरे, सूर्याच्या घरीं काय दिव्याच्या वातीनं उजेड होत असतो, कीं ती वात लाविली नाहीं, तर सूर्याला अंधारात कोंडून बसावें लागेल ? ६१ त्याप्रमाणेच, ऋद्धिसिद्धि आल्या काय आणि गेल्या काय, त्याची 'स्थितप्रज्ञाला' आठवणही नसते; तो १ उजाडलें, पहाट झाली. २ थोडाही. ३ धैर्यनाश. ४ वातीने,