पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी म्हणोनि अर्युक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ४७ ॥ सम०- इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते । तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७ ॥ ० - इंद्रियें वर्ततां जें कां मोकळें मन सोडिजे । तें त्याची हरितें प्रज्ञा वारा नाव जळीं जसा ॥ ६७ ॥ आर्या- धांवति विषय करणं ज्याचे घे धांव चित्त त्यामार्धे । हारी मग मन त्यांचे जैसी ने नाव अंबुच्या वो ६७ ऑवी--इंद्रियें विचरत असतां । आवरीना आपुले चित्ता । प्रज्ञा नाशे पाहतां । उदकीं नाव वायुबळें ॥ ६७ ॥ इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ४८ ॥ जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ४९ ॥ तैसीं प्राप्तेंही पुरुपें । इंद्रियं लाळिलीं जरी कौतुकें । तरी आक्रमिला जाण दुःखें | सांसारिकें ।। ३५० ।। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६८॥ सम॰—तस्मात्सर्वेद्रियें ज्याचीं विषयांपासुनी बरीं । आटोपिलीं महाबाहो त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित ॥ ६८ ॥ आर्या-यास्तव ज्याणें दमिलीं विषयापासोनि इंद्रिये सकळे । त्याची प्रतिष्ठित मती योगाची युक्ति सर्व ज्यास कळे ६८ ओवी - याकारण अर्जुना । विषयापासाव करी वंचना । टाकी इंद्रियवासना । त्याची प्रज्ञा प्रतिष्ठिली ॥ ६८ ॥ म्हणोनि आपुली आपणपया । जरी इंद्रियं येती आया । तरी अधिक कांहीं धनंजया । सार्थक असे ।। ५१ ।। देखें कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । ना तरी इच्छावरों आवरी । आपणचि ॥ ५२ ॥ तैसीं इंद्रियें आतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पावली असे ॥। ५३ ।। आतां आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह | अर्जुना तुज सांगेन । परिस पां ॥ ५४ ॥ आहे, अर्थात् हीं दोन्ही सारखींच अशक्य आहेत. ४६ म्हणून मनाचें अस्थिरपण तेंच दुःखाचें मूळ कारण; यास्तव इंद्रियांना आटोक्यांत ठेवणें हेंच इट आहे. ४७ म्हणून जे पुरुष इंद्रियांचा प्रत्येक शब्द झेलतात, ते या संसारांत तरतात असें जरी दिसलें तरी वस्तुतः त्यांचं तारण मुळींच होत नाहीं. ४८ जशी थंडीला पांचलेलीही नाव वादळी वाऱ्यानें उपडी झाली, तर भरनदींतला मागील ढळलेला प्राणघातक प्रसंग पुन्हां ओढवतो, ४९ त्याप्रमाणें स्वरूपस्थितीस पोचलेल्याही पुरुषानें जर इंद्रियांचे लळे मौजेनें पुरे करण्याला आरंभ केला, तर तो ' संसारदुःखांनी व्यापिलाच म्हणून समजावें. ३५० म्हणून, पार्थ, जर आपलीं इंद्रिये आपोआप आपल्या कह्यांत आलीं, तर त्यांत कांहीं विशेषच धन्यता आहे, असें समजावें. ५१ पहा, जसे कांसव शांतपणे आपले अवयव पसरतें, पण इच्छा होतांच त्यांना आवरून घेते, ५२ त्याप्रमाणं ज्याचीं इंद्रिये स्वाधीन राहून तो म्हणेल तें आचरितात, तोच 'स्थितप्रज्ञ' आहे, असे जाणावें. ५३ आतां पूर्णत्वास पोचलेल्या पुरुषाचें आणखी एक गूढ लक्षण तुला सांगतों तं ऐक. ५४ १ मोकाटपण, अनियंत्रण. २ प्रतिकूल वान्याच्या सपाट्यांत सांपडली. ३ आपसूक मिळालेल्या विषयानें.