पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ६७ देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिंगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३८ ॥ जैसा अमृताचा निर्झरु | प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृपेचा अडदरु | कहींचि नाहीं ॥ ३९ ॥ तैसे हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैंचें के आहें । तेथ औपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥ जैसा निर्वातींचा दीपु । सर्वथा नेणें कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूप | योगयुक्त ॥ ४१ ॥ नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ६६ सम० नाहीं बुद्धि अयुक्ताला अयुक्ता ध्यानही नसे । ध्यानाविणें न ये शांति अशांता कोठुनी सुख ॥ ६६ ॥ आर्या-बुद्धि अयुक्तास नसे ध्यानहि पार्था नसे अयुक्ताला । ध्यानाविण शांति नसे होइल सुख कोठुनी अशांताला ॥ ६६ ॥ ओंवी -- ज्ञानविना न सांपडे बुद्धि । बुद्धिविना भावशुद्धि | ध्यानावांचुनि शांति । कोदुनि ये सुख ॥ ६६ ॥ ये युक्तीची कडणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं । तो आकळिला जाण गुणीं । विपयादिकीं ॥ ४२ ॥ तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ४३ ॥ निवळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना । तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ॥ ४४ ॥ जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिघे कहीं । जैसा पापियाच्या ठायीं । मोक्षु न वसे ॥। ४५ ।। देखें अभिमाजी घाँपती । तियें बीजें जरी विरूढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥ ४६ ॥ अरे, ज्या अंतःकरणांत अखंड आनंदाचा वास आहे, त्या अंतःकरणांत संसारदुःखांचा प्रवेशच होऊं शकत नाहीं. ३८ ज्याच्या जठरामध्ये प्रत्यक्ष अमृताचा झरा उत्पन्न झाला, त्याला जशी तहानभुकेची भीति कधींच राहात नाहीं, ३९ तसेंच ज्याचें अंतःकरण अखंड आनंदाने भरलेलें आहे, त्याला दुःख कसें होणार ? त्याची बुद्धि परमात्मस्वरूपांत आपोआप ठाम असते. ३४० जसा निवात ठिकाणचा दिवा, न थरथरतां, सारखा तेवतो, तशी त्या योगयुक्त पुरुषाची बुद्धि स्वस्वरूपीं अचळच राहाते. ४१ ही स्थिरबुद्धीची बळकटी ज्याच्या अंतःकरणांत नसते, त्याच्यावरच त्रिगुणाच्या साह्यानें विषयांचा पाश पडतो. ४२ अर्जुना, अशा मनुष्याची बुद्धि स्थिर नसते, आणि ती स्थिर असावी अशी कल्पनाही त्याच्या अंतःकरणांत उदय पावत नाहीं. ४३ आणि, पार्था, स्थिरत्वाची जर कल्पनाच नसेल, तर मग शांतीचा लाभ कसा व्हावा ! ४४ जसा पाप्याच्या ठिकाणीं मोक्ष कधीही राहात नाहीं, तसाच जेथें शांतीचा जिव्हाळा नाहीं, तेथें सुख विसरूनसुद्धां डोकावत नाहीं. ४५ अरे, विस्तवांत भाजलेल्या बियांला मूळ फुटेल, तरच अशांताला सुखलाभ होण्याचा संभव १ अडथळा, विवंचना, २ आपण होऊन, आपोआप. ३ कंबरबांधणी, जोर, आधार. ४ आपली. ५ घातली जातात.