पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी होय देखें ||२८|| म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना । मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ २९ ॥ तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन | तरी येणें हैं पतन । गिंवसीत पावे ॥ ३३० ॥ रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्वरन् । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४॥ सम॰—रागद्वेषाविरहितें इंद्रियें वश जीं तिहीं । घेतो विषय शुद्धात्मा तो प्रसादासि पावतो ॥ ६४ ॥ आर्या - स्वाधीनइंद्रिय जरी विषयां भोगावयासि उद्योगी । रागद्वेषाविण मज जिंकुनि पावे प्रसाद मद्योगी ॥ ६४ ॥ भवी - रागद्वेष असे वर्जून । तो आत्मा वश करून । इंद्रियांसंगें भोग भोगून । तो प्रसाद भोगील ॥ ६४ ॥ म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मैनौनि सांडावे । मग रागद्वेप स्वभावें । नाशतील ॥३१॥ | पार्था आणिकही एक | जरी नाशले रागदेख | तरी इंद्रियांविषयीं बाधक | रमतां नाहीं ॥ ३२ ॥ जैसा सूर्य आकाशगतु । रश्मि करें जगातें स्पर्शतु | तरी संगदोपें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥ ३३ ॥ तैसा इंद्रियार्थी उदासीन | आत्मरसेंचि निर्मिन्न । जो कामक्रोधविहीन | होऊनि असे ॥ ३४ ॥ तरी विषयांतही कांहीं । आपणपेंवांचूनि नाहीं । मग विषय कवण कायी । वाधितील कवणा ।। ३५ ।। जरी उदकीं उदकें बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगें आलविजे । परिपूर्ण तो ।। ३६ ।। ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखलु । तयाची प्रज्ञा अळु | निभ्रांत मानीं ॥ ३७ ॥ प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५ ॥ सम० - प्रसादें याचिया सर्वा दुःखाचा नाश होतसे । प्रसन्नचित्तबुद्धीसी प्रतिष्ठा शीघ्र पावते ॥ ६५ ॥ आर्या-होतां प्रसाद चित्तीं निरसी दुःखा समूळही सुज्ञ । चित्त प्रसन्न ज्याचें जाणावा तो प्रतिष्ठितप्रज्ञ ॥ ६५ ॥ ओवी - प्रसाद पावलियावरी । सर्व दुःख होय बोहरी । आत्मप्रसादें चित्त आवरी । प्रतिष्ठा पावतो ।। ६५ ।। दशा शरीराला येते, तशीच बुद्धिनाशानें पुरुषाची दुर्दशा उडते. २८ म्हणून, अर्जुना, हें लक्षांत आण, कीं, एकच ठिणगी जळाऊ लांकडाला लागली, म्हणजे ती जशी विस्तार पावून, त्रिभुवनाला जाळण्याला पुरेशी होते, २९ तसेंच विषयांचें चिंतन मनाला जरी कदाकाळीं सहज झाले, तरीही त्यामुळे एवढा अधःपात ओढवतो. ३३० म्हणून हे सर्व विषय मनोभावेंकरून सोडावे, म्हणजे रागद्वेषही आपोआपच नष्ट होतात. ३१ शिवाय, पार्था, एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, कीं, रागद्वेष नम्र झाल्यावर, जरी इंद्रियांनीं विषयसेवन केलें तरी तें उपद्रव करीत नाहीं. ३२ ● जसा आकाशींचा सूर्य आपल्या किरणजालाने जगाला स्पर्श करितो, तरी जगाच्या संगदोपाचा संपर्क त्यास होत नाहीं, ३३ तसाच जो इंद्रियांच्या विषयांना लालचावला नसतो, आणि कामकोधांना सोडून टाकून जो आत्मानंदानें संतत परिपूर्ण होऊन राहातो, ३४ तरीपण उपभोगण्याच्या विषयांतही त्याला आत्मपणावांचून दुसरें कांहींच भासत नाहीं. मग कोणत्या विषयांनी कोणाला बाधा करावी, सांग बरें ? ३५ जर पाण्याने पाण्याला बुडविणे, किंवा विस्तवाला विस्तवाने पोळणें शक्य असेल, तरच अशा परिपूर्णाला विषय गांगरवून टाकतील ! ३६ अशा प्रकारें जो केवळ आत्मस्वरूपीं निर्भिन्नपणें राहातो, तो निःसंशय 'स्थितप्रज्ञ ' आहे, असें जाण. ३७ १ टिगी, २ कधी काळी चुकून, एकादे वेळी ३. एवढे ४ मनांतून. ५ परिपूर्ण. ६ आत्मस्वरूपावांचून.