पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ६५ जैसा कां विपाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासि ॥ १९ ॥ तैसी विषयाची शंका | मनीं वसती देखा । धातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥ ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६२ ॥ क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३ ॥ सम० - चिंती विषय जो त्यातें उपजे भोगवासना । ते कामातें उपजवी काम क्रोधासि निर्मितो ॥ ६२ ॥ को देहात्मतामोह मोहें आत्मस्मृतिभ्रम । स्मृतिभ्रंशें बुद्धिनाश मग तो मूढ पूर्ववत् ॥ ६३ ॥ आर्या-विषय ध्यानें पुरुषा होतो विषय धनंजया संग संगापासुनि काम क्रोध तयाचा उठेचि अनुसंग ॥ ६२ ॥ धापासुन मोहहि मोहापासुनि उठे स्मृतिभ्रम तो । स्मृतिनाशै मति नाशे प्रज्ञानारों भवभ्रमीं श्रमतो ६३ ओव्या-विषयांचे ध्यान करी । विषयसंगै काम अंतरीं । कामापासुनि क्रोध भारी । ऐसे हे होती निर्माण ॥ ६२ ॥ क्रोधापासूनि मोहो । स्मृतीच्या भ्रंश ठावो । स्मृति बुडलिया भावो । मूर्ख होतसे ॥ ६३ ॥ जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपेजे संगती । संगें प्रगटे मूर्ति | अभिलापाची ॥२१॥ जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आंदा क्रोधी असे ठेविला । संमोह जाणें ॥ २२ ॥ संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति | चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥ २३ ॥ कां अस्तमानीं निशी । जैशी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियासी ||२४|| मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजी || २५ || जैसी जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसे बुद्धीसि होती भवे । धनुर्धरा ।। २६ ।। ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे | ज्ञानजात ॥ २७ ॥ चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैशी । तैसें पुरुषा बुद्धिनाशीं । सगळा संसारच म्हटला पाहिजे. १८ जसा विपाचा एकच थेंब घ्यावा, पण तो विस्तार पावत जातो, आणि मग निःशंकपणें प्राणाचा घात करितो, १९ तशीच या विषयांची चुटपुटती शंका जरी मनांत उरली असली, तरी ती संपूर्ण विवेकमात्राचा सत्यनाश करिते. ३२० जर अंतःकरणांत विषयांची आठवण राहिली, तर ती संगरहितालाही विषयसंगति घडविते. या संगतीनें विषयवासना मूर्तिमन्त प्रकट होते. २१ जेथें विषयाविषयीं काम उद्भवला, तेथें क्रोधाचें आगमन आधींच घडतें; क्रोध आला कीं संमोह म्हणजे अविचार हा ठेवलेलाच ! २२ अविचार घडला, कीं जशी प्रचण्ड वाऱ्याने दिव्याची ज्योत मालविली जाते, तशीच स्मृति नाहींशी होते; २३ किंवा अस्तमानीं जशी रात्र सूर्यतेजाला गिळून टाकिते, तशीच दशा स्मृतिनाशानें प्राण्याला येते. २४ मग या अज्ञानाच्या अंधाराने सर्वत्र व्यापून गेल्यामुळें बुद्धि आंतल्याआत घावरी होऊन जाते. २५ मग, अर्जुना, जसा जन्मांधाला पळ सुटावा आणि त्यानें इकडे तिकडे केविलवाणें सैरावैरां धांवत भटकावं, तसाच बुद्धीला भ्रम होऊन ती भोवंडू लागते. २६ अशा रीतीनें स्मृतिभ्रंश होऊन बुद्धीची कठीण अवस्था झाली म्हणजे विवेकशक्तीचें बूडच नाहींसं होतें. २७ चैतन्याच्या नाशानें जशी १ प्राप्त होते. २ झडपलेली. ३ भोवळ, ९