पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६० ॥ सम० - ज्ञानी नर प्रयत्नी जो त्याचींही कुंतिनंदना । इंद्रिये बळवंतें हीं बळेंचि हरिती मना ॥ ६० ॥ आर्या-जरिहि साधक मोठा ज्ञानी पुरुष प्रयत्नही करितो । तरिही मधुनि हटानें इंद्रियगण त्याचिया मना हरितो ॥ ६०॥ ओंवी—पुरुष प्रयत्नविचक्षण । आपण ज्ञानी असोन । इंद्रिये मन नेती हरून । कौंतेया जाण तूं ॥ ६० ॥ हवीं तरी अर्जुना । हैं आयो न ये साधन । जे राहताती जतनां । निरंतर ॥ ३१० || जयांतें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनातें सदा मुठी | धरूनि आहाती ॥ ११ ॥ तेही किती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञातें विवेंसी । भुलवी कां ॥ १२ ॥ देखें विषय हे तैसे | पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिलें । मग आकळिती स्पर्शे । इंद्रियांचेनी ॥ १३ ॥ तिये संधीं' मन जाये । मग अभ्यासीं थोंटावलें ठाये । ऐसें बळकटपणा आहे । इंद्रियांचें ॥ १४ ॥ सम०- तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१ ॥ -तीं आवरोनि असतो युक्त होऊनि मत्पर । इंद्रियें वश हीं ज्याला त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित ॥ ६१ ॥ आर्या - युक्त असावें मत्पर ज्या सर्वेद्रियगणासि संयमुनी । इंद्रियगण वश ज्याला प्रतिष्ठितप्रज्ञ जाण तोचि मुनी ॥ ६१ ॥ ओवी - सर्व नेमालागुनी । युक्त नाहीं योगाहुनी । इंद्रियें वश केल्यानी । त्याचे ज्ञान प्रतिष्ठित ॥ ६१ ॥ म्हणोनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥ १५॥ तोचि तूं जाण । योगनिष्ठेोस कारण | जयाचें विषयसुखें अंतःकरण । झकवेना ।। १६ ।। तो आत्मबोधयुक्त | होऊनि असे सततु । तो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ १७ ॥ येन्हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसी होईल जरी कांहीं । तरी साद्यंतुचि पाहीं | संसारु असे || १८ || नाहींतर दुसऱ्या कोणत्याही उपायानें हीं इंद्रियें आराठीस येत नाहींत. अरे, जे यांना आवर- ण्याचा प्रयत्न करीत जपून वागत असतात, ३१० ज्यांची योगाभ्यासाची राखण नेहमीं चालू आहे, यमनियमांचे कुंपण ज्यांनीं आपल्याभोंवतीं घालून ठेवलें आहे, जे मनाला निरंतर आपल्या मुठींत धरून असतात, ११ त्यांनाही हीं इंद्रियें कासावीस करून सोडतात ! या इंद्रियांचा पराक्रम इतका गहन आहे ! जशी मांत्रिकाला जखीण भूल घालते, १२ तसेच हे विषय ऋद्धिसिद्धींची रूपें घेऊन येतात, आणि इंद्रियांना स्पर्श करून पुरुषाला भूल पाडतात. १३ अशा वेळीं मनावरील ताबा जातो व तें अभ्यास सोडून स्वस्थ बसतें. एकंदरीत इंद्रियांचें बळकटपण असें विचित्र आहे ! १४ म्हणून, अर्जुना, मी म्हणतों, विषयांची लालूच साफ टाकून देऊन, जो या इंद्रियांचें बळ अगदीं मोडून टाकतो, १५ तोच योगनिप्रेला – बुद्धिस्थैर्याला - समर्थ होतो. विषयसुखें ज्या पुरुषाच्या अंतःकरणाला भुलवू शकत नाहींत. १६ तोच सतत आत्मबोधानें सज्ज होऊन राहातो. त्याच्या अन्तःकरणांत माझा कधींही विसर पडत नाहीं. १७ नाहींतर दिसण्यांत विषयांचा संग नसूनही, जर मनाला विषयांचा थोडाबहुत लेश राहिला असेल, तर तो आरंभापासून शेवटपर्यंत १ साधनाने आहारी येत नाही. २ जोपासनेचा यत्न करतात. ३ गस्त, फिरता पाहारा. ४ हडळ, ५ वेळेस, प्रसंगी. ६ थबकून राहतें.