पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सम०- अध्याय दुसरा यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः । इंन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८ ॥ — जैसा कांसव सर्वांगें इंद्रिये विषयांतुनी । आवरूनि असे तेव्हां त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित ॥ ५८ ॥ आर्या-विषयांतुन आकर्षी इंद्रियगण जेविं अवयवां कूर्म । तोचि प्रतिष्ठितमती योगाचे जाणतो महा वर्म ॥ ५८ ॥ ओवी - कांसव अंग जैसे । हातपाय आंवरी सरसे। इंद्रिये आंवरूनि विशेषे । तया ज्ञान प्रतिष्ठिलें ॥ ५८ ॥ देखें कूर्माचिया परी । उवोइला अवेवं पसरी । ना तरी इच्छावरों आवरी । आपुले आपण ॥ १ ॥ तैसीं इंद्रियें औपती होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ २ ॥ विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्ज रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९ ॥ सम० - रोगी प्रती तयालाही न भोग तरि वासना । असे तेही ज्ञानियांची जाते ब्रह्मात्मदर्शनं ॥ ५९ ॥ आर्या-तों तों वाढे गोडी जों जों टाकीच विषय आहार । जेव्हां ब्रह्म कळे या गोडीचा तेंच होय संहार ।। ५९ ॥ ओंवी — निराहारी असे । विषयवर्जे तुटती फांसे । त्याची वासना असे । ती जातसे ब्रह्मदर्शनें ॥ ५९ ॥ अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक । जे विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥ ३ ॥ श्रोत्रादि इंद्रियें आवरिती । परि रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विपयीं इहीं ॥ ४ ॥ जैसी वरिवरी पालवी खडिजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ५ ॥ तो उदकाचेनि वळें अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांके | तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ६ ॥ येरां इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें । जें जीवन हैं ने घंटे । येणेंविण ॥ ७ ॥ मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥ ८ ॥ तैं शरीर- भाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जें सोहंभावप्रतीति । प्रगट होय ॥९॥ अर्जुना, कांसवाची रीत पहा, आनंदांत असला म्हणजे तो आपले अवयव बाहेर पसरतो, परंतु पाटेल तेव्हां आपले आपणच आंत ओढून घेतो. १ त्याप्रमाणेंच इंद्रियें ज्याला वश असतात आणि जो जें म्हणेल तेंच करितात, त्या पुरुषाची प्रज्ञा स्थैर्याला पावली, असें जाणावें. २ आतां, अर्जुना, तुला आणखी एक कौतुकाची गोष्ट सांगतों, ती ही, कीं, या योगाचें साधन करणारे पुरुष विषयांचा त्याग जरी मोठ्या निश्चयानें करितात. ३ तरी, कान, डोळे, इत्यादि इंद्रियें आवरूनही जर रसनेंद्रियाचा आवर झाला नाहीं, तर त्या साधकाला हे विषय या जगांत हजारों तन्हांनीं आपल्या पकडींत अडकवितात. ४ झाडाची पालवी वरवर खुडून टाकावी, पण त्याच्या मूळाशी पाणी घालावें, मग त्या झाडाचा नाश कसा बरें होईल ? ५ तो त्या पाण्याच्या बटानें जशा अधिकाधिक आडव्या तिडव्या डियडांगळ्या फोडतो, त्याप्रमाणेंच रसनेच्या साधनानें विषयांना मनुष्याच्या मनांत पुष्टी येते. ६ इतर इंद्रियांचे विषय तोडतां येतात, परंतु या रसनेंद्रि- याचें तसें हक़ानं नियमन करितां येत नाहीं, कारण याच्याशिवाय मुळीं जगणेंच शक्य नसतें. ७ मग, अर्जुना, ज्या वेळीं परब्रह्माचा स्वानुभवानें साक्षात्कार होतो, तेव्हां हा रसनाविजयही साधतो. ८ जेव्हां 'मीच ब्रह्म आहे' असा प्रत्यक्ष अनुभव येतो, तेव्हां देहधर्माचा लोप होतो, आणि इंद्रियांना विषयांचा विसर पडतो. ९ १ संतोपला. २ अवयव, गायें. ३ आपलींशी, स्वाधीन. ४ नुसता उभाच वाढत नाहीं, तर त्यास आडव्या फांद्या सर्व बाजूनी फुटून, त्याचा विस्तार गरारतो. ५ घडत नाही.