पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ॥ ९२ ॥ तो कामु सर्वथा जाये | जयाचें आत्मतोपीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥ ९३ ॥ दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६ ॥ सम० न दुःखीं मन उद्विग्न न सुखाची स्पृहा जया । कामक्रोधभयातीत स्थितधी मुनि बोलिजे ॥ ५६ ॥ आर्या- दुःखीं उद्विग्न नव्हे निस्पृहहि सुखीं असा दिसेल तर्धी । पार्थी क्रोधादिरहित जाणावा साधुंनीं जगीं स्थितधी५६ ओवी - दुःखें निश्चळ सुखसंगी । भय क्रोध टाकूनि वीतरागी । तो मुनि जाण जगीं । स्थितप्रज्ञ बोलिजे ॥ ५६ ॥ नानादुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखा- चिया आर्ती । अडपैजेना ॥ ९४ ॥ अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणे कहीं । परिपूर्ण तो ॥ ९५ ॥ ऐसा निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहित ॥ ९६ ॥ यः सर्वत्रानभिस्त्रहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥ समन्न सर्वत्र जया स्नेह बरें वाईट भोगुनी । बरे वाईट न म्हणे त्याची प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥ आर्या-पावुनि शुभाशुभांसहि हर्षद्वेषोर्मिची नदी उतरे । कोठें स्नेह नसे ज्या त्याची प्रज्ञा सदा प्रतिष्ठित रे ॥ ५७ ॥ ओंवी - शुभाशुभ प्राप्त झालिया । ममत्वें न गुंते तया ठाया । आनंदबुद्धि तया । त्याची प्रज्ञा प्रतिष्ठिली ॥ ५८ ॥ जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्ण चंद्र कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा । माजि न म्हणे ॥ ९७ ॥ ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता । आणि पालट नाहीं चित्ता । कवणे वेळे ॥ ९८ ॥ गोमटें कांहीं पावे | तरी संतोष तेणें नाभिभवे । जो ओखटेनि नागवे । विपादासी ॥ ९९ ॥ ऐसा हरिखशोक- रहितु | जो आत्मबोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥ ओतप्रोत भरलेलें असतें, परंतु ज्या सुखाभिलाषाच्या संसर्गानें मनुष्य विषयपंकांत पडतो, तसा दुष्ट सुखाभिलाष ज्याचा सर्वस्वीं नष्ट झालेला असतो, ९२ आणि ज्याचें मन आत्मसुखांत मग्न असतें, तोच पुरुष 'स्थितप्रज्ञ' होय. ९३ नाना प्रकारची दुःखें आलीं असतां ज्याच्या मनाला खेद घडत नाहीं, आणि जो सुखाच्या लालचींत अडकत नाहीं, ९४ अर्जुना, अशा पुरुषाच्या ठिकाणीं कामक्रोध हे साहजिकच नसतात, आणि त्याचें अंतःकरण नेहमींच आत्मानंदानें पूर्ण असल्यामुळे त्याला भयाचा गंधही नसतो. ९५ अशा स्थितीत जो निरंतर असतो, तो 'स्थिरबुद्धि' समजावा; तो विचारी पुरुष संसारांतील पेंचाचा परिहार करून, केवळ भेदरहित असतो. ९६ तो सर्वकाळ सर्वाशी सारखाच वागतो. ज्याप्रमाणें पौर्णिमेचा चंद्र प्रकाश देतांना, हा चांगला, याला प्रकाश दे, हा वाईट, याला अंधारांत ठेव, अशा तऱ्हेचा भेद करीत नाहीं. ९७ त्याप्रमाणेंच याची समवृत्ति भेदरहित असत. सर्वा भूतमात्रांविषयीं तो सारखाच सदय असतो, कोणत्याही काळीं त्याच्या चित्तांत भेद होत नाहीं. ९८ कांहीं चांगलें प्राप्त झाले, तरी जो आनंदाने वेडावत नाहीं, आणि कांहीं वाईट घडलें, तरी जो दुःखाच्या पंगस्तीस जात नाहीं, ९९ असा जो हर्षशोकानें रहित व आत्मज्ञानानंदाने ओतप्रोत भरलेला असतो, अर्जुना, तोच 'स्थितप्रज्ञ' जाणावा. ३०० १ अडविला जात नाहीं, गुरफटला जात नाही.