पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० प्रस्तावना झाली, आणि विठ्ठलपंत आतां स्वतंत्र गृहपति झाले. परंतु दिवसेंदिवस त्यांचे वैराग्य वाढीस लागले, आणि आतां हा संसाराचा गाडा कसा चालणार, या चिंतेनें रुक्मिणीबाई झुरणीस लागली. अखेर सिधोपंतांनी आपेगांवास येऊन या जोडप्यास आळंदीस नेलें. पण या थारेपालटानें विठ्ठलपंतांच्या वृत्तीत काडीमात्रही पालट झाला नाहीं. उलट पोटीं संतान नसल्यामुळे त्यांच्या विरक्त वृत्तीला जोरच चढला. शेवटी एक दिवस ते नदीवर स्नानाला म्हणून जे बाहेर पडले, ते परत आलेच नाहीत ! घरांतून बाहेर पडल्यावर विठ्ठलपंतांनीं तडक काशीक्षेत्राची वाट धरली, आणि काशीस पोचल्यावर त्यांनी आपल्या संसाराची खरी हकीकत न सांगतां, रामानंद स्वामी यांचा उपदेश घेऊन संन्यासदीक्षेचा स्वीकार केला ! इकडे रुक्मिणीबाई आळंदीस दुःखसागरांत निमग्न झाल्या. पतीच्या आकस्मिक नाहींसें होण्याने त्यांना लोकांत तोंड काढावयासही लाज वाटू लागली. पति कोठें असतील, आपली पुढे अवस्था काय होणार, आतां या जिण्यांत काय अर्थ आहे, इत्यादि विचारांनी त्यांचे अंतःकरण अगदी विदीर्ण होऊन गेलें. अखेर, वेळ जाण्याकरित पतिचिंतन करीत, एकभुक्त राहून, पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याचें व रात्रंदिवस ईश्वरभजन करण्याचें व्रत रुक्मिणीबाईंनी चालविलें. अशा रीतीने रुक्मिणीबाईंची कष्टांत काळक्रमणा चालली असतां, एकदां असा योग जुळून आला, कीं, रामानंदस्वामी रामेश्वरच्या यात्रेकरितां निघाले असतां, वाटेत त्यांचा आळंदीस मुक्काम झाला. ते मारुतीच्या देवळांत उतरले, आणि संध्याकाळीं देवदर्शनास आलेल्या रुक्मिणीबाईंनीं त्यांचे चरणवंदन केलें. तेव्हां स्वामींनीं नेहमींच्या सरावाप्रमाणें त्या सौभाग्यवतीस 'पुत्रवती भव' असा आशीर्वाद दिला. ह्या सहजासहजी मिळालेल्या आशीर्वादाने रुक्मिणीबाईस हसूं आलें आणि तो निष्फळ होणार म्हणून वाईटही वाटले. बाईची ही अवस्था पहातांच स्वामींनी खोदखोदून चौकशी केली, आणि बाईंच्या नाहीशा झालेल्या पतीच्या खाणाखुणा कळल्यावर, आपला नूतन शिष्य चैतन्याश्रम' हाच बाईचा पति असावा, अशी त्यांस खात्री वाटू लागली. पण हा शिष्य त्या वेळी त्यांचेबरोबर नव्हता, म्हणून स्वामी लगोलग काशीस परत गेले, आणि त्यांनी चैतन्याश्रमाचा जाब घेतला. सर्व कांहीं आर्ता उघडकीस आले आहे, हें पाहून चैतन्याश्रमाने आपला अपराध कबूल केला. संतानहीन स्त्रीला तिच्या अनुमतीवांचून टाकून देणारा गृहस्थ जर संन्यास घेईल आणि त्याला दीक्षा कोणी देईल, तर ते दोघेही दोषी ठरतात, हे जाणून या दोषक्षालनार्थ स्वामींनी, ' चैतन्याश्रमानें आळंदीस परत जाऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा,' अशी आज्ञा केली, आणि खजील झालेल्या चैतन्याश्रमानेही ती निमूटपणे पाळली. याप्रमाणें विठ्ठलपंत संन्याशाचे पुन्हा गृहस्थ बनले. विठ्ठल रुक्मिणीची वियोगाची साडेसाती संपून तीं आतां एकत्र नांदूं लागलीं खरी, पण त्यांच्यावर आतां समाजक्षोभाचें वादळ वाजूं लागलें. संन्यासी पुन्हा घरभारी झाला, ही गोष्ट केवळ अद्भुत होती; शिवाय त्यामुळे गृहस्थाश्रम व संन्यासाश्रम या दोघांसही उणेपणा येऊन समाजांत बजबजपुरी माजण्याचा फार संभव असल्यामुळे, आळंदीकर ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना वाळीत टाकले. अर्थात् त्यांना याबद्दल वाईट वाटलेच, परंतु आपलाच दाम खोटा असल्यामुळे त्यांस काहीच बोलतां येईना. बहिष्कृत स्थितींत विठ्ठलपंत आपला सर्व काळ ग्रंथवाचन, आत्मचिंतन, व ईश्वरभजन, यति घालवीत असत आणि त्यानें त्यांची समाधानवृत्ति टिकाव धरून राहिली. रुक्मिणीबाईही, पतिसेवेंत आपल्याला सर्व कांहीं लाभले, असे समजून आनंदांत असत. परंतु गृहाचाराचा स्वीकार केल्यावर लवकरच संतति होऊं लागली, आणि चिंतेच्या वाढीला नवाच धागा सांपडला. विठ्ठल रुक्मिणींस एकंदर चार अपत्यांचा लाभ झाला, तीन मुलगे व एक मुलगी. ज्येष्ठ चिरंजीव निवृत्ति, जन्मेशक ११९५; दुसरे ज्ञानंदेव, जन्मशक ११९७; तिसरे सोपान जन्मशक, ११९९; आणि अखेरचें अपत्य मुलगी मुक्ताबाई, जन्मशक १२०१. विठ्ठलपंतांस मुले झाल्यावर मात्र या मुलांचे पुढे कसे होणार याविषयीं त्यांस चिंतेचा हृद्रोग लागला. ही सर्वच मुले मोठीं तैलबुद्धीचीं होतीं, आणि विठ्ठलपंत स्वतः चांगले व्युत्पन्न असल्यामुळे मुलांच्या विद्याभ्यासांत १ कांही ठिकाणीं श्रीपादस्वामी' असें नांव आढळते. २ येथे दिलेले जन्मशक नामदेव, विसोबा खेचर, जनाबाई, सच्चिदानंदबाबा, इत्यादिकांच्या अभंगांत आढळतात. H