पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निवृत्तिनाथांस अनुग्रह कोणताही व्यत्यय आला नाहीं. पण जेव्हां निवृत्तिनाथ सात वर्षांचे झाले व त्यांचें उपनयन न झाल्यास त्यांस ब्राह्मणत्वच येणार नाहीं, असा प्रसंग येऊन ठेपला, तेव्हां मात्र विठ्ठलपंत अगदीं गयावया आले व 'आम्हांस पंक्तिपावन करून घ्या ' म्हणून त्यांनी आळंदीकर ब्राह्मणांची पायधरणी केली, परंतु त्यांस कोणीच आश्वासन देईना. अशा निराशामय स्थितीत विठ्ठलपंत सर्व कुटुंबाला घेऊन त्र्यंबकेश्वरीं अनुष्टानार्थ गेले. तेथे एक दिवस रात्री प्रदक्षिणेसाठी सर्वजणें बाहेर पडली असतां, एक भयंकर वाघ समोरून उड्या टाकीत येत असलेला त्यांच्या नजरेस पडला. अर्थात् त्या अक्राळविक्राळ दर्शनाने सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडून, त्यांची पांगापांग झाली या धांदलीत निरृत्तिनाथांची दिशाभूल होऊन ते अंजनीपर्वताच्या एका गुहेंत घुसले. याच गुहॅत नाथपंथाचे त्या वेळचे सांप्रदायिक गुरु गहिनीनाथ हे निवास करून राहिले होते. निवृत्तींस पहातांच गहिनीनाथांचे अंतःकरण त्यांच्याकडे ओढलें; आणि निरृत्तीचें लहान वय मनांत न आणतां, त्यांनीं त्यांना आपल्या संप्रदायाचे रहस्य सांगून, 'रामकृष्णहरि ' हा मंत्र दिला व कृष्णोपासना जगांत पसरविण्याची आज्ञा केली. ज्ञानदेव ज्ञानदेवींत सांगतात-- मग तिहीं तं शांभव अद्वयानंदवैभव संपादिलें सप्रभव श्रीगहिनीनाथा. १७५७ तेणें कटि कटितु भूतां आला देखोनि निरुता, ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा दिधली ऐसी . - १७५८ ना आदिगुरु शंकरा लागानि शिष्यपरंपरा बोधाचा हा संसारा जाला जो आमुतें. १७५९ तो हा तूं घेऊार्न आघवा कहीं गिळितयां जीवां सर्व प्रकारों धांवा करीं पां वेगीं १७६० आधींच तंव तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू जाला जैसा वरिषाकाळ खवळणें मेघां. १७६१ अध्याय १८ अशा प्रकारें सातव्या वर्षाच्या उमरीतच निवृत्तिनाथांना गुरूपदेश होऊन, ते जगदुद्धार करण्याच्या कार्यास गुरूच्या आदेशानें सिद्ध झाले. असो. मुलें मोठी होत चालली, ती ज्ञानसंपन्न होऊन अधिकारीही बनलीं, पण मौजीबंधनादि संस्कार न घडल्यामुळे ती ब्राह्मणत्वास मुकत आहेत, हें पाहून विठ्ठलपंतांचा जीव दुःखाने अगदीं गुदमरून जात होता. आळंदीकर वळतना, तेव्हां ते आपल्या मुलांबाळांस घेऊन आपेगांवास गेले. तेथील ब्राह्मणांनी त्यांना स्पष्ट सांगितलें कीं, तुमच्या दोषास देहदंडावांचून दुसरें प्रायश्चित्त नाहीं. अखेर विठ्ठलपंत अगदीच कंटाळले व ते आपल्या मुलांस वाऱ्यावर सोडून भार्येसह प्रयागास गेले व तेथेंच दोघांनी जळसमाध घेतली ! अशा प्रकारें निवृत्तिदेवादि भावंडे आतां केवळ उघडी व पोरकीं पडली. परंतु त्यांनी धीर न सोडता नुसतें कोरान्न मागून आपेगांव व पैठण येथें दिवस काढले व ब्राह्मणांनी आपल्यास पंक्तिपावन करून घ्यावें, म्हणून प्रयत्न चालविला. या मुलांची वृत्ति, चर्या, विलक्षण बुद्धिमत्ता व शीलवंतपणा, हीं पाहून पैठणकरांचे मन दवलें. वास्तविक या मुलांच्या शुद्धीकरणाचा प्रश्न फार नाजूक व भानगडीचा होता, संन्यासी होऊन पुन्हा कोलांटी खाऊन घरसंसार थाटणाऱ्या इसमाला कोणतें प्रायश्चित्त देऊन समाजपावन करावा याला शास्त्राधारच पैठणकरांस सांपडेना; मग त्याच्या संततीची वासलात कशी लावावी, ही गोष्टच बोलावयास नको होती. बरें, शास्त्राधारावांचून पुनर्गृहीभूत संन्याशाला व त्याच्या संतानाला पंक्तिपावन करून घ्यावें, तर त्यति संन्यासाश्रम व गृहस्थाश्रम या दोहोंसही कमीपणा येण्यासारखा होता. शिवाय, एकदा अशी वहिवाट पडली, म्हणजे आपमतलबी, लोभी, दुर्वृत्त, व विषयलंपट, व्यक्तीकडून या वहिवाटीचा गैरफायदा घेतला जाऊन समाजांत बेबंदशाही माजण्याचा फार संभव होता. या अडचणीच्या पेंचामुळेच तत्कालीन ब्रह्मवृंद या प्रश्नाचा निकाल झटपट देऊ शकला नाही. अखेर, विठ्ठलपंत व त्यांची भार्या या त्या प्रकरणांतील मुख्य व्यक्ति नाहीशा झाल्यावर, निवृत्तिप्रभृति निरपराध मुलांची शिंकुत्रत् स्थिति पाहून पैठणकर १ गोरक्षनाथांनी.