पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ६१ आत्मस्वरूपीं ॥। ८३ ।। समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ ८४ ॥ अर्जुन उवाच - स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४ ॥ सम० - स्थितप्रज्ञ कसा सांग जो समाधिस्थ सर्वदा । केशवा काय तो बोले असे वर्ते जग कसा ॥ ५४ ॥ आर्या - चित्तैकाप्ररताची स्थितधीची केशवा कवण भाषा । स्थितधी कसा असे तो बोले चालेहि सांग निर्दोषा ॥ ५४ ॥ ओवी - स्थितप्रज्ञाची बुद्धि कैसी ? | योगीं वर्तणूक कैसी ? | योग झालिया त्यासी । स्थितप्रज्ञ जाणिजे ॥ ५४ ॥ तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आतां सांगावा | कृपानिधी ॥ ८५ ॥ मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें । तें पूस पां उन्मेखें | मनाचेनि ॥ ८६ ॥ या बोला पार्थे । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें । काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ ८७ ॥ आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे । जो समाधि- सुख भुजे । अखंडित ॥ ८८ ॥ तो कवणें स्थिती असे । कैसेनि रूपीं विलैसे । देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ ८९ ॥ तंव पर अवतरणु । जो षड्- गुणाधिकरण | तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥ श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५ ॥ सम०-पार्थो सकळही टाकी जेव्हां काम मनांतिल । स्वरूपींच मनें तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिजे ॥ ५५ ॥ आर्या-टाकी जेव्हां पार्थो चित्तापासूनि सर्व कामासी । संतुष्टात्मा तेव्हां घरी स्थितप्रज्ञ योग्य नामासी ॥ ५५ ॥ ओंवी— देव म्हणे पार्था । जो नातळे काममनोरथा । आत्मसुखीं स्थिरता । तो स्थितप्रज्ञ बोलिजे ॥ ५५ ॥ म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेंसीं । करीत असे ॥ ९१ ॥ जो सर्वदा नित्यतृप्तु | अंतःकरणभरितु । शांत होते ८३ अशा रीतीनं आत्मसमाधीच्या आनंदाने बुद्धि शांत व स्थिर होईल, तेव्हांच तुला खरी योगावस्था प्राप्त होईल. ८४ 66 हें श्रीकृष्णाचें भाषण ऐकून अर्जुन म्हणाला, “देवा, याच सर्व विषयासंबंधें मी आतां कांहीं विचारणार आहें, तरी कृपा करून मला उत्तर द्यावें. " ८५ मग श्रीकृष्ण म्हणाले, “ बा अर्जुना, तुझ्या मनाच्या हौसेनें तुला जें कांहीं योग्य वाटेल, तें खुशाल विचार. ” ८६ हें कृष्णवचन ऐकून अर्जुन म्हणाला, “ स्थितप्रज्ञ " कोणाला म्हणावें ? त्यास कसा ओळखावा? हे मला सांगा. ८७ आणि ज्याला 'स्थिरबुद्धि' ही संज्ञा आहे, त्याचे लक्षण कोणते ? तसें जो अखंड समाधिसुख भोगतो, ८८ तो कोणत्या स्थितीत राहातो ! त्याचें रूप कसें असतें ? देवा लक्ष्मीनाथा, मला हें सर्व निवेदन करावं. " ८९ मग परब्रह्माचा अवतार व पड्गुणैश्वर्यसंपन्न असे श्रीकृष्ण काय बोलते झाले ते ऐका. २९० श्रीकृष्ण म्हणाले, "अर्जुना, ऐक. आत्मसुखाच्या आड येणारी म्हणजे मनांत वास करणारी प्रचळ विषयवासना होय. ९९ जो सदासर्वकाळ संतुष्ट असतो, ज्याचें अन्तःकरण समाधानानें १ मनाच्या उसळीप्रमाणे २ उपभोगतो. ३ विहार करतो, व्यवहारतो. ४ परब्रह्माचा अवतार. ५ अडथळा, बिन.