पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० सार्थ श्रीज्ञानेश्वरी होई स्थिरु | मनें करीं अव्हेरु । फळहेतूचा ॥ ७६ ॥ जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभयबंधी सांडिले । पापपुण्य ॥ ७७ ॥ कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥५१॥ सम० - शास्त्रज्ञ जे बुद्धियुक्त कर्माचें फळ टाकुनी । संसारबंध छेदूनी निर्दोषपद पावती ॥ ५१ ॥ आर्या-जे बुद्धियुक्त नर ते टाकुनि कर्मा फलानुसंधानें । पावति अनामयपदा होउनियां मुक्त जन्मबंधानें ॥ ५१ ॥ ओवी - म्हणोनि योगी कर्म करिती । फलसंगादिर्के त्यजिती । जन्मबंधावेगळे होती । पद पावती अनामय ॥ ५१ ॥ ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति न लोपती । अर्जुना तयां ॥ ७८ ॥ मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ ७९ ॥ यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५९ ॥ सम०-अज्ञान मोहमय हे तुझी बुद्धि तरे जयीं । श्रुतअश्रुतभोगाचें तेव्हां वैराग्य पावसी ॥ ५२ ॥ आर्या - जेव्हां बुद्धि तुझी हे पार्था उतरेल मोहमय कलिला । श्रोतव्यश्रत तेव्हां टाकिल पावोनि भक्तिची कलिला ५२ ओवी - ज्ञान जाणित लिया। मोहसागरीं तरसी धनंजया । पाविजे तया ठाया। वैराग्य पावसी ॥ ५२ ॥ तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें यया सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥ २८० ॥ मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचोड होईल मन । असें तुझें ॥ ८१ ॥ | तेथ आणिक कांहीं जाणावें । कां मागिल तें स्मरावें । हें अर्जुना आघवें । पारुपेल ॥ ८२ ॥ श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३ ॥ सम० -- लौकिकश्रवर्णे तूझी मळली शुद्ध होय हे । बुद्धि थोर समाधींत तेव्हां तूं योग पावसी ॥ ५३ ॥ आर्या०—श्रुति विप्रतिपञ्चा तव बुद्धि समाधीमधींच साअचळ । जेव्हां स्थिर होइल बा तेव्हां योगासि पावसी अचळ ५३ ऑवी - श्रवणसंदेह वाटेल जरी। संदेह टाकूनि सांवरीं । तेणें पावसी अवधारीं । योगाभ्यास ॥ ५३ ॥ इंद्रियांचिया संगति । जिये पैसरु होतसे मती । स्थिर होईल मागुती । म्हणून बुद्धियोग हा खरोखर बळकट आधार आहे, तरी या योगाच्या ठिकाणीं तूं स्थिर हो आणि मनानें फलवासनेचा त्याग कर. ७६ जे या बुद्धियोगाला भिडले, तेच संसाराच्या परतीराला जातात आणि त्यांना पापाचे व पुण्याचे असे दोन्ही बंध शिवत नाहींत. ७७ ते जरी कर्म आचरतात, तरी कर्मफळाला लगटत नाहींत, आणि म्हणून, अर्जुना, जन्ममर- णाच्या येरझारा त्यांना स्पर्शत नाहींत. ७८ यानंतर, हे धनुर्धरा पार्था, बुद्धियोगानें सिद्ध होत्साते ते दुःखरहित अशा शाश्वतपदाला पोचतात. ७९ जेव्हां तूं या मोहाला सोडशील आणि जेव्हां तुझ्या वासनांचा क्षय होईल, तेव्हां तूंही असाच होशील. २८० नंतर तुला अत्यंत शुद्ध व गहन आत्मज्ञान प्राप्त होईल, आणि तुझें मन आपोआपच वासनारहित होईल. ८१ अशा स्थितींत, कांहीं आणखी जाणावें किंवा मागले विसरावें, अशा प्रकारच्या सर्वच कल्पना शांत होतील. ८२ इंद्रियांच्या सहवासाने ज्या मतीला चंचलतेचे फांटे फुटतात, ती आत्मस्वरूपलाभानें पुन्हां १ निर्मित व शान्त झालेले. २ निस्पृह, निरिच्छ, ३. चळवळ, चंचलता.