पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ५९ देउनी । करीं कर्मै ॥ ६७ ॥ परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे । तरी विशेषें तेथ तोपावें । हेंही नको ॥ ६८ ॥ कीं निमित्तं कोणे एकें । तें सिद्धी ने वचत ठोके । तरी तेथंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ ६९॥ आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहाँलें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥ देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदि- पुरुषीं अर्पिजे । तरी परिपूर्ण सहजें । जहालें जाणें ॥ ७१ ॥ देखें संत- संत कैमीं । हें जें सरिसेपण मनोधर्मी । तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ ७२ ॥ अर्जुना समत्व चिंताचें । तेंचि सार जाण योगाचें । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ ७३ ॥ · दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय । बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥ बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥ ५० ॥ सम० - बुद्धियोगाहुनी नीच कर्म फार धनंजया । पाहे रक्षक बुद्धींत तुच्छे कर्मों फळप्रदे ।। ४९ । 11 जितांचि पापपुण्यांत नाशितो बुद्धियुक्त जो । म्हणोनि योगीं तूं योज कमी कौशल्य योग तो ॥ ५० ॥ आर्या ० – जाणुनि सुबुद्धियोगाहुनि पार्था कर्मयोग तो अवर । जा बुद्धीस शरण वा कृपणफळेच्छेस तूं कदा न वर ४९ जो बुद्धियुक्त नर तो टाकी दुष्कृत सुकृतउपशल्य । यास्तव योगासि करीं योगचि तो जाण कर्मकौशल्य ५० ओवी - बुद्धियोगाहुनी हीन । ज्ञानयोगातें इच्छून । कर्म करीं फल टाकून । तुच्छ फळ ॥ ४९ ॥ ओंवी — ज्ञान अंगीकारूनी । फळें हरपती दोनी । योगातें अंगीकारूनी । कुशल होय ॥ ५० ॥ तो बुद्धियोगविवरित । बहुतें पौडें पार्था । दिसे हा अंरुता । कर्मभा ॥ ७४ ॥ परी तेंचि कर्म आचरिजे । तरिच हा योग पाविजे । जें कर्मशेष सहजें । योगस्थिति ॥ ७५ ॥ म्हणोनि बुद्धियोगु सधरु | तेथ अर्जुना हातीं घेतलेले काम दैवयोगार्ने तडीस गेलें म्हणून आनंदानें चढून जाणे नको. ६८ तसेंच कांहीं कारणानें तें काम फसलें तरीही खेदानें तडफडणें नको. ६९ कर्म आचरल्यावर तें तडीस गेलें, तर कारणींच लागलें; परंतु तें फसलें तरीही नीटच झालें, असें समज. २७० अरे जें जें कर्म घडेल, तें तें, आदिपुरुष जो परमेश्वर त्याला अर्पण करावं, म्हणजे ते सहजच पूर्णतेला जातें. ७१ पार्था, संतोषदायक किंवा कष्टकारक, कसंही स्वकर्म असले, तरी ते आचरितांना मनाची वृत्ति शांत व समतोल राहाणं, यालाच उत्तम ज्ञाते लोक 'योगस्थिति' असें म्हणतात. ७२ बा अर्जुना, चित्ताचा समतोलपणा हेंच या योगाचें सार आहे, आणि या समतोलपणांत मन आणि बुद्धि यांचें पूर्ण ऐक्य असतें. ७३ अर्जुना, त्या बुद्धियोगाचा विचार करूं लागलें, म्हणजे हें कर्मभागाचें प्रकरण त्याच्या फारच अलीकडले आहे, असं दिसूं लागतें. ७४ परंतु तें कर्मकांडच या बुद्धियोगाचें साधन आहे, कारण अशा निष्काम रीतीनें कर्म सिद्धीस जाणें म्हणजेच योगस्थिति संपादन झाली, असें होतें; ७५ १ न जातां मध्येच खुंटते. २ चांगले झाले. ३ सिद्धीस गेलेले कार्य व सिद्धीस मुकलेले कार्य; यशस्वी कामगिरी, व फसलेली कामगिरी, ४ अचंचळता, ठामपणा, ५ विवरण करूं गेल्यास अनेक प्रकारे करता येण्यासारखे आहे. ६ अलीकडचा.