पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके । तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥ सम०--जें जें कार्य जळीं क्षुद्रीं होतें डोहांत सर्व तें । वेर्दी काम्यसुखं तंत्री ब्रह्म ब्रह्मज्ञ जो तथा ॥ ४६ ॥ आर्या०-- कूपादि उदकपानीं जीं कार्ये तीं महान्हदीं घडती । तैशीं वेदोक्तफळे ब्रह्मज्ञान्यासि सर्व सांपडती ॥ ४६ ॥ भवी --स्वल्प उदर्की घडे जें कांहीं । तें सर्व संपादिती -हदाचे ठायीं । वेदशास्त्रज्ञासही । तें सुख ब्रह्मीं मिळे ४६ 110 जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तन्ही आपण हित आपुलें । तेंचि घेणें ॥ २६० ॥ जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेपही मार्ग दिसती तरी तेतुलेहि काय चालिजती । सांगें मज ॥ ६१ ॥ कां उदक- मय सकळ । जही जाहलें असे महीतळ । तरी आपण घेपें केवळ । आतींच- जोगें ॥ ६२ ॥ तैसे ज्ञानी जे होती । ते वेदार्थातें विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥ ६३ ॥ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥ सम० -- अधिकार तुर्ते कर्मी तत्फळीं न कदापिही । झणीं तूं टाकिसी कर्म झणीं तूं फळ इच्छिसी ॥ ४७ ॥ आर्या०-- कर्मी अधिकार असो न कर्षी त्याच्या फळीं असो पार्था । न फळासी कारण हो न त्यागावैच कर्मरूपार्था ४७ भवी - कर्माधिकारी होऊनी । तें फळ न धरीं मनीं । फळाविरहित होवोनी । कर्म करावें ॥ ४७ ॥ म्हणोनि आइकें पार्था । याचि परी पहातां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ ६४ ॥ आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें । जे न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥ ६५ ॥ परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतृविण ॥ ६६ ॥ योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय । सिद्धयसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते॥४८॥ सम० - योगस्थ करें कर्मे तूं होउनी टाकुनी फळें । सिद्धी असिद्धींत सम समत्वा योग बोलिजे ॥ ४८ ॥ आर्या ● - - योगस्थ होउनि करीं कर्मा सोडुनि धनंजया सुमता । सिद्धि असिद्धी सम त्या मानीं तूं जाण योग तो समता ॥ अवी-योग आचरोनी । कर्मफळसंग त्यजुनी । सिद्धी असिद्धी सम धरूनी । तो अनुरागी ॥ ४८ ॥ तूं योगयुक्त होउनी । फळाचा संगु टाकुनी । मग अर्जुना चित्त अरे, वेदानें जरी पुष्कळ सांगितलें असलें, नानाप्रकारचे विधिभेद सुचविले असले, तरी आप- ल्याला जेवढे हितकारी असेल, तेवढेच आपण त्यांतून घ्यावें. २६० सूर्य प्रकट झाला म्हणजे सर्वच वाटा उजळतात, पण त्या सर्वच वाटांनीं आपण जावें काय ? ६१ अथवा, जरी सर्व पृथ्वीतळ पाण्यानें आच्छादून गेलें असले, तरी आपण आपल्या आवश्यकतेपुरतेंच पाणी त्यांतून घ्यावें, ६२ त्याप्रमाणेंच ज्ञानी लोक वेदार्थाचें चिंतन करितात, आणि मग आपल्याला आवश्यक असा जो त्यांत सारांश असेल, तोच ग्रहण करितात. ६३ म्हणून, अर्जुना, या धोरणानेंच विचार केला, तर है स्वकर्म आचरणें तुला अगदीं योग्य आहे. ६४ आम्ही आपल्याशींच जेव्हां खोल विचार केला, तेव्हां आमच्या मनाला हेंच पटलें, कीं, तूं आपले शास्त्रसिद्ध कर्म सोडूं नकोस. ६५ परंतु असें करितांना कर्मफळाची आसक्ति तू धरूं नयेस आणि दुष्कर्माचा संपर्कही होऊ देऊं नयेस. निष्काम मनानें तूं ही स्वधर्मक्रिया आचरावीस. ६६ तूं योगयुक्त हो, फलसंग सोडून दे, आणि मग मनःपूर्वक स्वकर्माचे आचरण कर. ६७ परंतु १ ध्यावे. २ आवश्यकतेपुरतेच.