पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ५७ ॥४९॥ परी एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥ जैसा कर्पूराचा राशि कीजे । मग अमि लाऊनि दीजे । कां मिष्टान्नीं संचैरविजे । काळकूट ॥ ५१ ॥ दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें ॥ ५२ ॥ सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ।। ५३ ।। जैसी रांधवणी रसोय निकी । करूनियां मोलें विकी । तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥ ५४ ॥ म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तयां वेदैवादरतां । मनीं वसे ॥ ५५ ॥ teaver वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वन्द्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥४५॥ सम०—काम्याचे वेदविषय पार्था निष्काम होय तूं । आणि निश्चित निद्वंद्व नित्य सत्वस्थ आत्मवित् ॥ ४५ ॥ आर्या ० -- सस्वस्थ द्वंद्वरहित निर्गुण हो त्रिगुणविषय हा वेद । जितचित्ता कौंतेया योगक्षेमीं न वाहिजे खेद ॥ ४५ ॥ ओंवी -- त्रिगुणात्मक वेद जाण । अर्जुना ! होय तूं निर्गुण । सच्चै राहें द्वंद्व त्यजून । आत्मवीं असोनियां ॥ ४५ ॥ तिहीं गुणीं आवृत । हे वेद जाण निभ्रांत । म्हणोनि उपनिपदादि समस्त । सात्विक ते ।। ५६ ।। येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक । जें केवळ स्वर्गसूचक | धनुर्धरा ॥ ५७ ॥ म्हणोनि तूं जाण । हें सुखदुःखां- सीच कारण । एथ झणें अंतःकरण | रिंगों देसी ॥ ५८ ॥ तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करी । एक आत्मसुख अंतरी | विसंघ झणीं ॥५९॥ कर्मे करितांना विधिमंग होऊ न देतां, ते अत्यन्त प्रावीण्यानें धर्मानुष्ठान करितात. ४९ परंतु ते एकच वाईट गोष्ट करितात, ती ही, कीं, स्वर्गभोगाचा स्वार्थ मनांत ठेवून, यज्ञभोक्ता जो पुराणपुरुष त्याला विसरून जातात. २५० जशी कापुराची रास करावी आणि मग तिला आग लावून द्यावी, किंवा गोड अन्नांत जसें काळकूट विष कालवावें, ५१ अथवा सुदैवाने अमृताचा घट सांपडला असतां तो लायेनें उपडा करून टाकावा, तसे हे अविवेकी कर्मकांडी लोक सहेतुक कर्म आचरून हाती आलेल्या धर्माचा नाश करितात. ५२ कष्ट श्रम करून पुण्य संपादावें, मग संसाराचीच याचना का करावी? परंतु आपल्याला मिळालेली नाहीं अशी कोणती वस्तू संपादन करावी, हें या अविवेक्यांना कळत नाहीं. ५३ जसा उत्तम पाक करून रसाळ अन्न संपादावें, आणि मग त्याचें मोल करून ते विकून टाकावें, तसेच हे सुखभोगरूपी मोलाकरितां धर्माचा विका करितात. ५४ म्हणून, अर्जुना, मी म्हणतों, कीं, या वेदाच्या अर्थवादांत गुरफटलेल्या लोकांच्या मनांत दुर्बुद्धीनें बिन्हाड ठेविलेलं असतं. ५५ हे वेद निःसंशय सत्त्व, रज, तम, या गुणत्रयांत गुंतलेले आहेत, आणि म्हणूनच उपनिषदा- दिकांना सात्विक समजावयाचें. ५६ त्यांच्याशिवाय जी इतर स्वर्गसुखादिकांची लालूच दाखवि णारीं यज्ञादि कमैं, तीं सर्व रज व तम गुणांनीं व्याप्त झालेलीं असतात. ५७ म्हणून तूं हें जाण, कीं, ह्रीं कर्मों सुखदुःखाला कारण होतात, तेव्हां तूं आपलें अन्तःकरण यांच्या नादी लागू देऊ नकोस बरं का. ५८ तूं या गुणत्रयाला झाडून टाक, 'मी, माझें ' इत्यादि बोली सोडून दे, आणि त्वरा करून एकट्या आत्मसुखावरच आपल्या अन्तःकरणाचा सर्व भार ठेव. ५९ १ कालवावें. २ न लाभलेले. ३ अन्नपाक, रसई. ४ वेदांच्या शब्दाला चिकटून राहणाऱ्यांच्या. ५ आच्छादित, व्याप्त. ८