पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जोडे परिसु । कां अमृताचा लेशु | देवगुणं ॥ २४० ॥ तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि | जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ ४१ ॥ तैसें ईश्वरा- वांचुनि कांहीं । जिये आणीक लोणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ ४२ ॥ येर ते दुर्मति । जे बहुधा असे विरती । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ ४३ ॥ म्हणोनि तयां पार्थी । स्वर्गसंसारनरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ ४४ ॥ सम० - यामिमां पुष्पितां वाचं प्रवदत्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥ कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुलां भोगेश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥ भोगैश्वर्यप्रसक्तानां तयाऽपहृतचेतसाम् । व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥ - श्रुतींत स्वर्ग जो पुष्प मूर्ख तें फल मानिती । ते वेदवादींच रत नाहीं म्हणति आणखी ॥ ४२ ॥ इच्छिती स्वर्गपर जे जन्मकर्मफलप्रदा । बहुकर्मद्रव्यसाध्या भोगभाग्यगती अशा ॥ ४३ ॥ भोगभोग्यांत आसक्त कामनाहृतबुद्धि जे । एकाग्रता समाधींत न बुद्धीस तयांचिया ॥ ४४ ॥ आर्या - अज्ञानी जे मानव पुष्पितवाणीच हे तयां मान्य । जे वेदवादरत ते म्हणती नाहींच याविना अन्य ॥ ४२ ॥ जी जन्मकर्मफलदा कमैं बहुला सकाम मानव तो । भोगैश्वर्यगती जे स्वर्गार्थी बहु तिलाच मानवतो ॥ ४३॥ पुष्पितवासि भुलले भोगैश्वर्यप्रसक्ततेविषयीं । व्यवसायात्मिक बुद्धी त्याला नोहे समाधिच्या विषयीं ४४ ओव्या - वेदवाचा पुष्पित । स्वर्ग फूल त्यजावें सांगत । अज्ञिया वसे निश्चित । फल टाकूनि कर्म करी ॥ ४२ ॥ सकामबुद्धि आचरती । स्वर्गसुखातें पावती । पुण्य सरलिया अंतीं । पुनरपि भोगिती भोग ॥ ४३ ॥ भोगभोग्यांत आनंद । कामनाहृत स्वरूपानंद । एकाग्रता समाध । तयाची हे न बुद्धि ॥ ४४ ॥ वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळी आसक्ती । धरूनियां ॥४५॥ म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ।। ४६ ।। एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ ४७ ॥ देखें कामना- अभिभूत | होऊनि कमैं आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ ४८ ॥ क्रियाविशेषे बहुतें । न लोपिती विधतेिं । निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती नाहीं, किंवा दैवयोगानेंच अमृताच्या कणाचा लाभ होतो, २४० तशीच, जिचें पर्यवसान परमात्म- प्राप्तीत होतें, ती ही सुबुद्धि फार दुर्लभ आहे. जसा नदीचा ओघ व रोख नेहमीं समुद्राकडेच असतो, ४१ तसाच जिला ईश्वरावांचून दुसरा कोणताही साध्य विषय नाहीं, अशी या जगांत ही एकच सुबुद्धि आहे. ४२ या सुबुद्धीवेगळ्या ज्या दुसऱ्या बुद्धि त्या दुर्बुद्धि समजाव्या. त्यांना विकारांची बाधा होते व अविवेकी जन त्या बुद्धींत सतत रममाण होतात. ४३ म्हणूनच, पार्था, त्या अविवेक्यांना स्वर्गवास, संसारवास, व नरकवास, हे प्राप्त होतात, आणि आत्मसुखाचें नुसतें दर्शनही घडत नाहीं. ४४ ते वेदाचा आधार घेऊनच केवळ कर्मकाण्डाचें प्रतिपादन करितात. ४५ पण कर्मफलावर खून म्हणतात, 'संसारांत जन्मावें, यज्ञक्रिया कराव्या, आणि मग गोड स्वर्गसुख भोगावें. ४६ यावांचून दुसरे कोणतंही सुख नाहीं.' अशा प्रकारें ते दुर्बुद्धि अविवेकी जन बोलत असतात. ४७ अर्जुना, ते सकाम होऊन आणि केवळ भोगावर दृष्टि ठेवून कर्म आचरतात. ४८ नाना प्रकारची १ अंतिम ध्येय, अखेरचें साध्य. २ तोंड, पिकाची कापणी ३ विकृत झालेली. ४ देव्हारे माजवितात.