पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ५५ नेहाभिकमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४० ॥ सम० - विघ्नें अपूर्णता येथें नसे न प्रत्यवायही । नाशी थोरा भयातही स्वल्पही ईश्वरार्पित ॥ ४० ॥ आर्या - जेथे अनुक्रमाचा न नाशहि प्रत्यवायही कांहीं । स्वल्पहि धर्म पहा हा राखी वारुनि भया अनेकांहीं ॥ ४० ॥ ओवी - निष्काम कर्मे करणें । प्रत्यवाय नव्हे बोलणें । थोडिया धर्मातेंनि करणं । महाभयें तरशील ॥ ४० ॥ 1 जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैसी उरिजे | अचुंवितं ॥ ३२ ॥ तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥ ३३ ॥ कर्माधारें तरी राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञ न बाधिजे । भूतबाधा ॥ ३४ ॥ तियापरी जे सुबुद्धि । आपुला लिया निरवधि | हा असतांचि उपाधि । आकळू न सके ॥ ३५ ॥ जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ ३६ ॥ अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ ३७ ॥ व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन । बहुशाखा हानंताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ ४१ ॥ सम० - निश्चयाची बुद्धि एक या मार्गी कुरुनंदना । बहुशाखा अशा बुद्धी अनंता कामुकांचिया ॥ ४१ ॥ आर्या-व्यवसायात्मिक बुद्धी धरिं पार्थो एक तूं अविच्छिन्न । अव्यवसायी जे नर त्यांच्या बुद्धी अनंतही भिन्न ॥ ४१ ॥ ऑवी – बुद्धि निश्चयात्मक । यालागीं बुद्धि एक । बहुभाग बुद्धि देख | कामुकाचिया ॥ ४१ ॥ जैसी दीपकळिका धाकुटी । परी वह तेजातें पगटी । तैसी सदबुद्धि हे घेर्कुटी । म्हणां नये ॥ ३८ ॥ पार्थो बहुत परीं । हे अपेक्षिजे विचार शूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्धासना ।। ३९ ।। आणिकांसारिखा बहुवसु । जैसा न जसें वज्राचे चिलखत घालावें आणि मग शस्त्रांचा कसाही वर्षाव सहावा लागला, तरी विजयीपण अबाधितच राहते, ३२ तसेंच या बुद्धियोगाचं साधन झाले म्हणजे ऐहिकाचा तर नाश होत नाहींच, शिवाय मोक्षही आपला वांटा म्हणून राखून ठेवलेलाच असतो ! या बुद्धियोगांत पूर्वी सांगितलेल्या सांख्ययोगाचाही अन्तर्भाव आहेच, ३३ कारण, या बुद्धियोगाचे तत्त्व असें आहे, कीं, कर्म करीत तर राहावयाचेच, परंतु कर्मफळावर आसक्ति ठेवावयाची नाहीं. जशी मांत्रिकाला भूतबाधा होत नाहीं; ३४ तसाच हा बुद्धियोग पूर्णपणे साधला म्हणजे कोणताही उपाधि असला तरी तो मनुष्याला बाधा करूं शकत नाहीं. ३५ ज्या बुद्धियोगांत पापपुण्याला प्रवेश नाहीं, जो अतिसूक्ष्म व अढळ असून, सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनीं दूषित होत नाहीं, अशा या बुद्धियो- गाचा पूर्वपुण्याईनें जरी अल्पसा प्रकाश मनुष्याच्या अन्तःकरणाला लाभला, तरीही, बा अर्जुना, त्याच्या संसारभयाचा समूळ नाश होतो. ३७ दिव्याची ज्योत लहान असली, तरी ती जरी पुष्कळ प्रकाशाला प्रकट करिते, तशीच ही सदबुद्धि जरी अल्प असली, तरी तिला लहान गणूं नये, कारण तिचा प्रभाव फार मोठा आहे. ३८ पार्था, विचारी पुरुष नाना उपायांनीं हिच्या साधनाचा उद्योग करितात, कारण ही सद्वासना या चराचर विश्वांत फार दुर्मिळ आहे. ३९ जसा इतर धोंड्यांसारखा परीस विपुलपणें सांपडत १ अभंग चिलखत २ अक्षत, घाय न लागतो. ३ अबाधित ४ लहान. ५ इच्छावी.