पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी लेवेंचि काय बुडिजे । कां मार्गी जातां आडळिजे । परी विपायें चालों नेणिजे । तरी तेही घडे || २३ || अमृतें तरीचि मरिजे । जरी विसीं सेविजे । तैसा स्वधर्मी दोषु पाविजे । हेतुकपणें || २४ || म्हणोनियां पार्था । हेतु सांडूनि सर्वथा । तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥ २५ ॥ सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥ सम० - लाभालाभ सुखं दुःखं जयापजय हे सम । मानूनि करेिं तूं युद्ध या पाप न पावसी ॥ ३८ ॥ आर्या- करुनि समान जयाजय लाभालाभास सौख्यसंतापा । मग करिं योग रणाचा येणें पार्था न पावसी पाप ॥ ३८ ॥ ओवी - सुख दुःख सम करूनी । लाभ अलाभ न धरीं मनीं । अजयो जयो सांडुनी । युद्ध करितां पाप नाहीं ॥ ३८ ॥ सुखीं संतोपा न यांवें । दुःखीं विपादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजी || २६ || एथ विजयपण होईल । कीं सर्वथा देह जाईल । हें आधीच कांहीं पुढील । चितावें ना ॥ २७ ॥ आपणयां उचिता । स्वधर्मे राहातां । जें पावे तें निवांता | साहोनि जावें ॥ २८ ॥ ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणोनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २९ ॥ एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । बुद्धया युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ३९ सम० - • सांख्य हे बोलिलों बुद्धी योगाची बुद्धि आइक । ज्या कर्मयोगबुद्धीनें कर्मबंधासि तोडिशी ॥ ३९ ॥ आर्या-कथिली सांख्याविषयीं यापरि मी सांगतों मती परिस। जी कर्मबद्ध न करी कोण दुजी श्रेष्ठ युक्तियापरिस३९ ओवी - बुद्धि सांख्यमतीची । सांगेन तुला मुळींची । तेणें तुटतील भवबंधाचीं । कर्मबंधनें ॥ ३९ ॥ हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज येथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३०॥ जया बुद्धि युक्ता । जाहलिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥ ३१ ॥ पार्था, तूंच सांग बरें, कीं नावेचा आसरा केला असतां मनुष्य बुडतो का? किंवा मळलेल्या वाटेनें जाणारा मनुष्य कधी अडखळून पडतो का ? पण कदाचित्, ज्याला नीटसें चालतां येत नाहीं, तो मटलेल्या वाटेंतही अडखळेल. २३ विपाबरोबर मिसळून जर अमृत प्राशन केलें, तर त्या अमृतानें ही मरण येते, तसेंच सकामबुद्धीनं जर ' स्वधर्म' आचरला, तर तोही दोपाला कारण होतो. २४ म्हणून, अर्जुना, सर्व वासना सोडून जर तूं क्षत्रियधर्म आचरशील, तर त्यांत पाप मुळींच नाहीं. २५ सुखाने हुरळूं नये, दुःखाने खचूं नये, आणि 'स्वधर्म ' आचरितांना लाभालाभाची कल्पनाही मनांत आणूं नये. २६ आजच्या प्रसंगांत विजय मिळेल, कीं आपला देह सर्वस्वीं नष्ट होईल, ही पुढची गोष्ट आधीच मनावर घेऊन चिंता करीत कां बसावें ? २७ आपला हा उचित ' स्वधर्म ' आचरीत असतां, जे जे अंगावर येईल, तं तं स्वस्थ चित्ताने सहन करीत जावें. २८ अशी मनाची तयारी झाली, म्हणजे सहजच पापाचरण घडत नाहीं. एकंदरींत सांगावयाचें इतकेंच कीं सर्व संशय टाकून देऊन तूं लढण्याला सिद्ध हो. २९ हा सांख्यांचा ' ज्ञानयोग ' मी तुला थोडक्यांत कथन केला; आतां कर्मयोग्यांचा 'बुद्धियोग विस्तारानं सांगतां, तो ऐक. २३० हा बुद्धियोग साधला असतां, कर्म कधीही बंधक होत नाहीं. ३१ १ नावेमुळेच २ गुकाट्यानें ३ संक्षेपाने, थोडक्यांत. "