पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ५३ जया देखीं जगीं सुभट । जाणते जाले ॥ १३ ॥ तें पौरुप तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ १४ ॥ जैसा सिंहाचिया हांका | युगांत होय मैदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥ १५ ॥ जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें । तैसे अर्जुना है तूतें । मानिती सदा ।। १६ ।। तें अगावपण जाईल । मग हीणांवो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥ १७ ॥ आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइ- कतां तुज ॥ १८ ॥ मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लांठेपणे कां न झुंजावें । हे जितले तरी भोगावें । महीतळ ॥ १९ ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः॥३७॥ सम०--मेलिया पावसी स्वर्ग जिंकिल्या राज्य भोगिसी । यालागि ऊठ कौंतेया करूनी युद्धनिश्चय ॥ ३७ ॥ आर्या-मरसिल तरि स्वर्ग मिळे जिंकिशि तरि भोगिशील हे धरणी । यास्तव ऊठ संख्या तूं हो दृढनिश्चय करूनि सिद्ध रणीं ॥ ३७ ॥ ओवी - मेलिया स्वर्गप्राप्ती । वांचल्या होसील पृथ्वीपती । हें धरूनियां चित्तीं । युद्धालागीं उठीं गा ॥ ३७ ॥ ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अन- कळित | पावसील ॥ २२० ॥ म्हणोनि ये गोठी । विचार न करी किरीटी । आतां धनुष्य घेऊनि उठीं । जुंझ वेगीं || २१ || देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । पातकाची ॥ २२ ॥ सांगें अशा तुझ्या गंगाप्रवाहासारख्या निर्मल व भरीव महिम्यानं या जगांत मोठमोठ्या वीरांना क्षात्रधर्माचा धडा देऊन जाणते केले आहेत. १३ तो तुझा अद्भुत पराक्रम ऐकून, हे सर्व शत्रुपक्षांतील योद्धे आपल्या जीविताविषयीं निराश झाले आहेत. १४ सिंहाची गर्जना ऐकून जसा मदोन्मत हत्तींना प्रळयकाळच पातला असें वाटतं, तसाच या समस्त कौरवांना तुझा धाक वाटत आहे. १५ जसे पर्वत वज्राला, किंवा साप गरुडाला, आपला काळ समजतात, तसे हे कौरवही तुला आपला काळच मानितात. १६ परंतु जर तूं आज न लढतांच माघारा फिरशील, तर हा तुझा दबदबा जाईल, आणि हलकेपणा अंगीं लागेल ! १७ आणि तूं पळून जाऊं लागलास, तर हे शत्रु तुला पळू देणार नाहींत, तुला अटक करून तुझी अवहेलना करितील, आणि तुझ्या तोंडावर जें वेडेंवांकडें बोलतील, त्याची गणतीही करवणार नाहीं. १८ मग त्या वेळीं तुझें हृदय फुटून जाईल, तेव्हां आतांच थोर पराक्रम करून कां झुंजूं नये ? हे शत्रु जिंकले गेले, तर खुशाल पृथ्वीचें राज्य तरी भोगावें ! १९ त्यांतूनही लढता लढतां जीवितास आंचवलास, तर तूं स्वर्गीचं सुख खटपट न करितांच मिळविशील. २२० म्हणून, हे अर्जुना, या गोष्टीचा आतां विचार न करितां, धनुष्य घेऊन ऊठ आणि झटपट युद्धाला लाग. २१ असे पहा, आपला 'स्वधर्म ' आचरल्याने अंगी असलेलेही पाप नाहींसें होतं. मग या कृत्यांत पापदोष आहे, अशी भ्रमि कल्पना तुझ्या मनांत आली तरी कशी ? २२ १ मत्त छत्नीला, २ हीनपणा. ३ अपमान, फजिती. ४ हृदय. ५ शौर्याने. ६ असेल नसेल तें सर्व पाप,