पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी न सुटिजेल | कृपाळूपणें ॥ ४ ॥ ऐसेनिहि प्राणसंकरें | जरी विपायें पां निघणें घंटे । तरी तें जियालें वोखटें । मरणाहुनी ॥ ५ ॥ भयाद्रणादुपरतं मंस्यंते त्वां महारथाः । येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५ ॥ सम० - भयें रणांतुनी गेला म्हणतील महारथी । मान्य होऊनिही यांतें पावसी बहु लाघव ॥ ३५ ॥ आर्या - पार्था महारथी हे म्हणतिल तुजला रणासि हा भ्याला । ज्यांसी मान्य सदा तूं भासेल लघुत्व यांचि लभ्यांला ॥ ३५ ॥ ओवी - भयँकरूनि परतसी । हें कळेल रथियांसी । शूरीं थोरपण पावलासी । तेथें पावसी अपमान ॥ ३५ ॥ तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी । आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी ॥ ६ ॥ तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां । कां प्रत्यया येईल मना | सांगें मज ॥७॥ अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यंति तवाहिताः । निदंतस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६ ॥ सम॰—बोलों नयेति ते बोल बोलती बहु शत्रु हे । सामर्थ्य निंदिती तुझें त्याहुनी दुःख कोणते ॥ ३६ ॥ आर्या-बोलूं नयेचि जें तें पार्था तुज बोलतील रिपु दुष्ट । निंदिति तव सामर्थ्या याहुनि आणीक कोणते कष्ट ॥ ३६ ॥ ओवी - बोलों नये तें बोलती । तव सामर्थ्य वैरी निंदिती । लाज होईल क्षितीं । हैं मोठें दुःख ॥ ३६ ॥ हे म्हणती गेला रे गेला । अर्जुन आम्हां विहाला । हा सांगें बोल उरला | निका कायी ॥ ८॥ लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ ९ ॥ ते तुज अनायासें । अनकळित जोडली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ।। तैसी कीर्ती निःसीम । तुझ्या ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ ११ ॥ दिगंतींचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे आइकिलिया दच- कती । कृतांतादिक ॥ १२ ॥ ऐसी महिमा घनवट | गंगा तैसी चोखट | तुझी सुटका करणार नाहीं. ४ अशांतूनही जरी प्राणसंकट सोसून तूं कदाचित् निसटलासच, तरी तें जगणंही मरणाहून वाईट ! ५ शिवाय, अर्जुना, तूं दुसऱ्या एका गोष्टीचा अजून विचार केला नाहींस. अरे, तूं येथे मोठ्या थाटानें लढण्याकरितां आलास, आणि आतां जर कोंवळ्या मनानें माघारा परतलास, ६ तर तुझ्या या वर्तनाचा या दुष्ट वैन्यांच्या मनांवर कांहीं परिणाम होईल का ? सांग बरें. ७ हे म्हणतील, 'अर्जुन आम्हांला भिऊन पळाला रे पळाला !' मग सांग पाहूं, हा बोल लागलेला चांगला काय ? ८ हे जर चांगले म्हणशील, तर मग, वा पार्था, लोक श्रम सायास करून जीवि ताचाही बेंच करितात, पण आपली कीर्ति वाढवितात, ती कां म्हणून ? ९ ती कीर्ति तुला सहजासहजीं, खटपट न करितां मिळाली आहे. जसें हें आकाश अफाटपणानें निरुपमेय आहे, २१० तशीच तुझी कीर्तीही अमर्याद उपमारहित आहे. तीन्ही लोकांत तुझे गुण श्रेष्ठ आहेत. ११ अरे, दूरदूरचे राजेही तुझ्या कीर्तीचं वर्णन भाटांप्रमाणे करतात, आणि तें वर्णन ऐकून यमादिकांनाही दचका बसतो ! १२ १ घडेल, २ थाटानें, समारंभानें,