पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ५१ अथ चेत्त्वमिमं धर्म्य संग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्म कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि ॥३२॥ सम० - आतां या धर्मयुद्धातें करीनासचि तूं जरी । तरी स्वधर्मकीर्तीत टाकूनी पाप पावसी ॥ ३३ ॥ आर्या- आतां स्वधर्म अपुला या संग्रामा न आजि आदरितां । धर्माच्या नाशातें कीर्तीच्या करुनि पावशी दुरितां ॥ ३३ ॥ ओवी - आपला स्वधर्म सांडोनी । संग्राम न करिसी रणीं । उत्तम श्रेय हारवूनी पावसी पापा ॥ ३३ ॥ आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं वैसिजे । तरी आपण हाणा होजे । आपणपेयां ॥ ९६ ॥ पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धोडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥ ९७ ॥ असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । आणि विसित पावतील । महादोप ॥ ९८ ॥ जैसी भातरंहीन वनिता । उपहति पावे सर्वथा । तैशी दशा जीविता | स्वधर्मैवीण ॥ ९९ ॥ ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥ २०० ॥ अकीर्ति चापि भूतानि कथयिष्यति तेऽव्ययाम् । संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥३४॥ सम० - अपकीर्ति तुझी लोक आचंद्रार्कहि वर्णिती । दुष्कीर्ति मान्य पुरुषा मरणाहूनि वाइट ॥ ३४ ॥ आर्या-शाश्वत पार्था तूझी भूतें हीं वर्णितील अपकीर्ति । संभावितासि अपयश मरणाधिक जाच देतसे अंतीं ॥३४॥ ओंवी—अधर्म अपकीर्ती । लोक निंदा बोलती । तुझे शत्रु हांसती । तें मरणातुल्य ॥ ३४ ॥ म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥ १ ॥ जाणतेनि तंवचि जियावें । जंब अपकीर्ति आंगा न पंवे । आणि सांग पां केवीं निगावें । एथोनियां ॥२॥ तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसील कीर माघौता । परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥ ३ ॥ हे चहूंकडूनि वेढितील । वाणवरी घेतील । तेथ पार्थी 1 आतां अशा संग्रामाचा अव्हेर करणें आणि नसत्याच गोष्टीबद्दल रडत बसणं, म्हणजे स्वता स्वतांचाच घात करणें होय. ९६ जर या रणांत तूं आज शस्त्र खालीं टाकून दिलंस, तर तुझ्या पूर्व- जांनी संपादन केलेले जे यश तुझ्या वांट्याला आलें आहे, तें तूं आज गमाविलेंस, असें होईल. ९७ संपादन केलेली कीर्ति लोपून जाईल, जग तुला शिव्याशाप देईल, आणि, मग महापातकें तुला ग्रासीत येतील. ९८ जैशी पतीवांचून राहिलेली स्त्री सर्व प्रकारें अपमान पावते, तशीच दशा, 'स्वधर्म ' न आचरल्यास, तुझ्या जीविताची होईल. ९९ किंवा रानांत टाकलेले प्रेत जशीं गिधाडे चारी बाजूंनी फाडतात, तसेंच तुझें जीवित स्वधर्महीन झाल्यास, तें महापातकांनी चौफेर विदारिलें जाईल ! २०० म्हणून जर तूं स्वधर्म सोडशील, तर पापांत गुंतशील आणि तुझी अपकीर्ति कल्पान्तापर्यंत नाहींशी होणार नाहीं. १ जाणत्याने तोंपर्यंतच जगावें, कीं जोंपर्यंत अंगाला अपयशाचा डाग लागला नाहीं. शिवाय, तूं येथून कसा निघून जाणार, तें सांग पाहू. २ तूं सर्व वैर सोडून मोठ्या कृपाळू अन्तःकरणाने येथून मांगें निघून जाणार, परंतु ही तुझी अन्तःस्थ स्थिति या सर्वाना कशी कळणार ? ३ ते तुला चौफेर वेढा घालतील, तुझ्यावर बाण टाकितील, तेव्हां तुझा कृपाळूपणा १ अगत्य. २ नाशकर्ता, ३ गमावलें, ४ पतिहीन. ५ अपमान. ६ चारी बाजूंनी ७ पराभूत करावें. ८ जाईल, टळेल, ९ अंगाला चिकटत नाही.