पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० शि. प्र. मंडळी सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ८५ ॥ वायांति व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु तूं पाहीं । जो आच रितां वाधु नाहीं । कवणे काळीं ॥ ८६ ॥ जैसें मार्गेचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ ८७ ॥ तयापरी पार्था । स्वधर्मे राहातां । सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥८८॥ म्हणोनि तूं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥। ८९ ।। निष्क- पटा होवें । उसिणो घोई जुंझावें । हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥ १९०॥ यच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥ ३२ ॥ सम०—प्रार्थिदयावीण जें झालें स्वर्गाचें द्वार ऊघडें । सुखी निभर्य ते ऐसें युद्ध क्षत्रिय लाघती ॥ ३२ ॥ आर्या - आयासाविण मिळतां स्वर्गाचें द्वार युद्ध हैं उघडें । मानावें सौख्य मन पार्था क्षत्रियजनें महा सुघडें ॥३२॥ ओवी— देव म्हणे पार्थासी । दैवें आणिला रणासी । मुक्त स्वर्गद्वारासी । युद्ध क्षत्रियां लाभू ॥ ३२ ॥ अर्जुना जुंझ देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥ ९१ ॥ हा संग्राम काय म्हणिपे । कीं स्वचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥ ९२ ॥ नां तरी गुणाचेनि पति- करें । आतींचेनि पडिभैरें । हे कीर्तीचि स्वयंवरें | आली तुज ॥ ९३ ॥ क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तैं जुंझ ऐसें लाहिजे । जैसें मार्गे जातां आर्डेळिजे । चिंतामणि ॥ ९४ ॥ ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्राम हा देख । पातला असे ॥ ९५ ॥ कल्याणाचा नाश होतो; म्हणून, अर्जुना, तूं आतां भानावर ये. ८५ उगाच दुःखीकधी कां होतोस ? ज्या स्वधर्माप्रमाणे आचरण केलें असतां त्रिकाळीही दोष घडत नाहीं, तो आपला ' स्वधर्म ' तूं पहा. ८६ अरे, जसें मळलेल्या वाटेने चालत असतां कधींही अपाय होत नाहीं, किंवा दिव्याच्या उजेडाचा आसरा घेऊन वावर करीत असतां, अडखळावें लागत नाहीं, ८७ तसेंच, अर्जुना, स्वधर्मानुरूप आचरण केलें असतां, सर्व कामना सहजच सिद्ध होतात. ८८ म्हणून तूं हें समज, कीं, तुम्हां क्षत्रियांना संग्रामावांचून दुसरें कांहींही करणें उचित होणार नाहीं. ८९ निःशंक व्हावें आणि टिपरघाई करून लढावें. पण हें आतां पुरे झालें; जी गोष्ट उघडउघड दिसत आहे, तीविषयीं उगाच पाल्हाळ कशाला लावावा ? १९० अर्जुना, असें पहा, हें सांप्रतचे युद्ध म्हणजे तुमचें सुदैव किंवा सर्व धर्माचारांचे भांडारच उघडलें आहे ! ९१ अरे, याला ' संग्राम ' हें नांवही योग्य नाहीं ! हा संग्रामरूपाने प्रत्यक्ष स्वर्गन प्रात झाला आहे, किंवा हा मूर्तिमंत प्रतापाचा उदयच म्हणावा. ९२ अथवा, तुझ्या गुणांविषयींच्या आदराने आणि आवडीच्या भरानं तुला स्वयंवरविधीनं वरण्याकरितां ही मूर्तिमन्त कीर्तिच जणूं काय प्राप्त झाली आहे ! ९३ क्षत्रियाने जेव्हां विपुल पुण्याचा संग्रह करावा, तेव्हां कोठें त्याला अशा प्रकारच्या संग्रामाची जोड होते. जसे वाटेने चालत असतां सहज 'चिंतामणीच्या खड्यावर अडखळून पडावें, ९४ किंवा जांभईकरितां तोंड पसरलें असतां, त्यांत अकस्मात् अमृत पडावें, तसाच हा आजचा युद्धाचा प्रसंग उपस्थित झाला आहे. ९५ १ उसा आवेशाने २ स्वीकाराने, आदरानें. ३ अतिशयाने ४ ठेचाळावें, अडखळावे. ५ एकाएकी.