पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा ४९ देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत । तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३० ॥ सम० - देहधारी न हा वध्य सर्व देहांत भारता। भूतें तों नश्वरें तस्मात् त्यांच्या शोका न योग्य तूं ॥ ३० ॥ आर्य- देहीं सकळांच्याही पार्था देही अवध्य हें घोक । यास्तव भूतांविपर्य न करीं सखया मनांत तूं शोक ॥ ३०॥ ओवी -देही नित्यवंत पाहीं । जीव वधिला न वचे कांहीं । हा सर्व भूतांचे ठायीं । वृथा शोक करू नको ॥ ३० ॥ जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ ७७ ॥ जयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ ७८ ॥ एन्हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मने चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परी ॥ ७९ ॥ स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि । धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥ सम० – स्वधर्म पाहुनी कंपा करायाहि न योग्य तूं । धर्मयुद्धाहुनी श्रेय क्षत्रियांस न आणखी ॥ ३१ ॥ आर्या - निजधर्मावर दृष्टी देउनि पार्था भिऊं नको युद्धा । युद्धाविण तो क्षत्रिय न पवे कल्याण हे धरीं श्रद्धा ॥ ३१ ॥ ओवी - स्वधर्म जाणसी जरी । भयासी नव्हसी अधिकारी । धर्मयुद्धाहुनी श्रेय तरी । क्षत्रिया अधिक नसे ॥ ३१ ॥ तूं अनि कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥ या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजाच कांहीं पातलें । कीं युगचि हैं बुडालें । जन्ही एथ ॥ ८१ ॥ तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काइ पाहें । कृपाळू- पणें ॥ ८२ ॥ अर्जुना तुझें चित्त । जन्ही जाहलें द्रवीभूत । तन्ही हें अनु- चित | संग्राम समयीं ॥ ८३ ॥ अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । ऐसेनिहि विप होय सुंदलें । नवज्वरीं देतां ॥ ८४ ॥ तैसें आंनी आन करितों । नागु होईल हिता । म्हणऊनि तूं आतां । सावध होई जं सर्व ठिकाणी व सर्व देहांत राहतें आणि ज्याचा घात करण्याचें मनांत आणिलं असतांही घात होऊं शकत नाहीं, तें एकरूप चैतन्य या विश्वाचा आत्मा आहे, हं तूं जाण. ७७ ह्याच्याच स्वाभाविक धर्मानं हे भूतमात्र उत्पन्न होतें व लयाला जातें, तर मग तूं अशा स्थितीत कशाबद्दल शोक करावास ? ७८ खरोखरच, अर्जुना, हें सर्व न सांगतांच तुझ्या मनाला कां पहूं नये, हें कळत नाहीं. परंतु तुझें हें शोक करणे अनेक प्रकारांनीं दोषमय आहे. ७९ अरे, तूं अजूनही नीट विचार कां करीत नाहींस ? तूं कसले चिंतन करीत आहेस ? अरे, ज्या स्वधर्मानं आपलं तारण व्हावयाचे, त्या स्वधर्मालाही तूं विसरलास ! १८० या कौरवांचे किंवा तुझंही कांहीं भलते सलतं झालं, किंवा येथे प्रत्यक्ष कल्पान्तच झाला, ८१ तरी आपला जो एक ' स्वधर्म' म्हणून असेल, त्याचा त्याग कोणत्याही प्रकारें योग्य नाहीं. अरे स्वधर्माचा त्याग केला, तर मग तुझें हें आतांचं कृपाळूपण तुझें तारण करील काय ? ८२ अर्जुना, जरी तुझें अंतःकरण वयं विरघळलं आहे, तरी या युद्धप्रसंगी ते केवळ अयोग्य होय. ८३ अरे ! चांगले गाईचे दूध आहे, पण तं तापकऱ्याला पथ्य म्हणून सांगितलें नाहीं; असे असतांही जर तें नवज्वराच्या रोग्यास पाजिले, तर तं विषच होते. ८४ तसेच प्रसंगविचार न करितां भलतंच भलत्या वेळी केलं असतां १ बाट २ कोणीतरी कांहींतरी भरमसाठ केले असता.