पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आकाशीं विंवत | अभ्रपटल || ६८ || तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कार्य । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ।। ६९ ।। जयाचि आतचि भोगित । विपयीं त्यजिले संत । जयालागीं विरक्त | वनवासिये ॥ १७० ॥ दृष्टी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें । आचरताती ॥ ७१ ॥ आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः । आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९ ॥ सम० - आश्चर्यवत् पाहति यासि कोणी । आश्चर्यवत् बोलति एक वाणी ॥ आश्वर्यवत् ऐकति एक कानीं । कोणी अहो नेणति आइकोनी ॥ २९ ॥ आर्या - आश्चर्यापरि कोणी ऐकुनि नेणे तसाचि बा पाहे । कोणी ऐकुनि नेणे आत्म्याशी जाणती न बापा हे ॥ २९ ॥ अवी- आश्वर्यरूप कोणी देखती। आश्चर्य कोणी बोलती ऐकती। आईकोनि विसरती । आश्चर्य थोर ॥२९॥ एक अंतरीं निवळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसार- जात ॥ ७२ ॥ एकां गुणानुवाद करितां । उपरति होऊनि चित्ता । निरवधि तल्लीनता | निरंतर ॥ ७३ ॥ एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडिले । एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥ ७४ ॥ जैसे सरिताओघ समस्त । समुद्रा- माजी मिळत । परी माघौते ने समात । परतले नाहीं ॥ ७५ ॥ तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीस एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ ७६ ॥ आण. आकाशाला डकलेलं अभ्राचें पडट जसे मूळांतच नसतें, ६८ तसें हें जन्मलयाचें लिगाड जर मूळांतच असू शकत नाहीं, तर त्याच्याबद्दल तुझी ही रडारड कां म्हणून ? अरे, तूं पक्कं समज, कीं, हें एकरूप चैतन्य कधींही विटत नसतें, तें नेहमीं अविकृतच राहते. ६९ या चैतन्यतत्त्वाची आवड जडली म्हणजे संतांना विषयवासना सोडून जातात, या चैतन्याकरितां विरागीजन वनवास पतकरितात, १७० आणि याच्यावर दृष्टी रोखून मोठे मुनिजन ब्रह्मचर्यादि व्रतें व तपें आचरितात. ७१ कित्येक या केवळ तत्त्वाला स्तब्ध अन्तःकरणानें पाहतां पाहतांच संसाराचा सारा पसारा विसरून गेले. ७२ दुसरे कित्येक या चैतन्यतत्त्वाचे गुण वाचेनें वर्णितां वर्णितांच विरक्त होऊन, पूर्ण व शाश्वत तल्लीनता पावले. ७३ दुसरे कोणी या चैतन्याविषयीं श्रवण करूनच समाधान पावले व त्यांची देहबुद्धि नाहींशी झाली. आणखी कोणीएक, या तत्त्वाला प्रत्यक्ष अनुभवानं जाणून, त्याच्याशी समरस होऊन गेले. ७४ आणि ज्याप्रमाणें समस्त नद्यांचे प्रवाह समुद्राला मिळतात, पण, जरी ते समुद्रांत मिळून सामावले नाहींत, तरीही कधी परत मागे वळत नाहींत, ७५ त्याप्रमाणेच योग्यांच्या बुद्धि चैतन्यास मिळतांच त्याच्याशी समरस होतात, परंतु जरीही त्यांना चैतन्यसाक्षात्कार होऊन समरस होण्याचे साधलें नाहीं, तरीही ते या चैतन्यतत्त्वापासून कधीही पराङ्मुख होत नाहींत. ७६ १ समावत नाहीत आणि म्हणून मार्गे परततात, असे घडत नाही २ परिभ्रमण, येरझारा.